New Delhi : देशभरात अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर दररोज धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पक्षाच्या आमदाराचे नाव समोर आले आहे. केवळ उत्तर प्रदेश नाही तर विविध राज्यांमध्ये पेपर लीक करत असल्याची कबुलीच या आमदाराने दिली आहे.
पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशातील जखनिया मतदारसंघाचे आमदार बेदी राम यांचे नावही समोर आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून काँग्रेसनेही एक्सवर पोस्ट केला आहे.
पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या बिजेंद्र गुप्ता या व्यक्तीनेही बेदींचे नाव घेतले आहे. त्यानंतर बेदींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेपरफुटीबाबत डील करताना बेदी राम पैशांच्या देवाणघेवाणीविषयी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मी छोटी कामं करत नाही, मोठी कामं करतो, असेही ते म्हणताना दिसत आहे.
परीक्षांमध्ये सगळं काही आतून सेट करत असल्याचा दावाही आमदार महाशय करत आहेत. माझे काम यूपीशिवाय इतर राज्यांतील भरती परीक्षांमध्येही असते. एकावेळी मी 40-40 भरती करत असल्याचा दावाही ते करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे बेदी यांना 2014 मध्ये यूपीतील रेल्वे भरती पेपरफुटीच्या प्रकरणात अटक करण्यात आले होते. त्यांचे नाव आणखी एका पेपरफुटीमध्ये समोर आले होते. ते उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे विश्वासू मानले जातात. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे.
बेदी राम यांच्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. बेदी राम हे भाजपचे जवळचे नेते आहेत. बेदी राम हे पेपर लीक असतात, हे सर्वांना माहिती असताना त्यांना एनडीएमध्ये का ठेवले आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
यूपीतील लोक सांगतात की, बेदी राम उघडपणे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगींचे नाव घेऊन मिरवतात. माझे कुणी काही बिघडवू शकत नाही, पेपर लीक होणार, त्याला कोणी रोखू शकत नाही, असे बेदी म्हणत असल्याचे ट्विट काँग्रेसने केले आहे. काँग्रेसकडून बेदी राम यांचे योगींसह इतर नेत्यांसोबतचे फोटोही ट्विट करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.