NEET paper leak : मोदी सरकारला हादरविणाऱ्या प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत मोठी अपडेट; 8 दिवसांतच हटविल्याने खळबळ

NEET UG 2026, Anu Grover Baliga : पेपरफुटी प्रकरणांसाठी स्थापन केलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टातील न्यायाधीशांची केवळ आठ दिवसांत बदली; अचानक निर्णयामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्र सरकारवर नवे प्रश्नचिन्ह.
Judge Anu Grover Baliga
Judge Anu Grover BaligaSarkarnama
Published on
Updated on

Fast-Track Court update : मागील काही महिन्यांपासून देशात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मोदी सरकारने पेपरफुटीची प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी दिल्लीत तातडीने फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू केले. मात्र, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी सरकारी वकिलांअभावी प्रकरणाला ब्रेक लागला. त्यानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे.

दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीश अनु ग्रोवर बलीगा यांची आठ दिवसांतच बदली करण्यात आली आहे. अचानक झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना झाल्यानंतर मागील आठवड्यातच त्यांच्यावर विशेष न्यायाधीश म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता नव्या आदेशाने त्यांची जबाबदारी बदलण्यात आली आहे.

दिल्ली हायकोर्टाने न्यायाधीश अनु ग्रोवर यांच्यावर एनआयए कोर्टात बदली केली आहे. दिल्लीत राऊज एव्हेन्यू कोर्टातील विशेष एनआयए कोर्टात त्यात दहशतवादाशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करतील. दिल्ली हायकोर्टाने त्यांच्यावर अन्य १३८ न्यायाधीशांचीही बदली केली आहे. हे आदेश शनिवारी (ता. १ ऑगस्ट) जारी करण्यात आले. त्यांचे कामकाज ४ ऑगस्टपासून सुरू होईल.

Judge Anu Grover Baliga
CJP Maharashtra : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र; अभिजीत दीपके लाखो तरुणांसह शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या मुद्यावरून लढा उभारणार?

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केली होती. त्यानंतर हायकोर्टाकडून न्यायाधीश बलीगा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या संवेदनशील प्रकरणात सरकार वेगाने काम करत असल्याची चर्चा असतानाच वकिलांअभावी पहिलीच सुनावणी टाळल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. आता न्यायाधीशांच्या बदलीने पुन्हा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

Judge Anu Grover Baliga
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

कोण आहेत न्यायाधीश अनु ग्रोवर बलीगा?

न्यायाधीश अनु ग्रोवर बलीगा या मुळच्या दिल्लीच्या असून गणित विषयातून पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत २००० मध्ये दिल्ली न्यायिक सेवेत पहिले पाऊल टाकले. त्यांची सुरूवात तिहार हजारी कोर्टातून दिवाणी न्यायाधीश म्हणून झाली होती. विविध न्यायालयांमध्ये जबाबदारी सांभाळल्यानंतर २०१० मध्ये त्यांची अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. संवेदनशील आणि गंभीर प्रकरणांसी संबंधित न्यायालयांमध्ये त्यांनी विशेष न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. त्या २०२९ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com