Nepal Protest : नेपाळमध्ये उद्रेक वाढला, संतप्त आंदोलकांनी थेट संसद पेटवली

Nepal Protest : नेपाळी तरणांनी अर्थात जेन झी तरुणांनी पुकारलेलं आंदोलन आणखी चिघळलं आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी राजीनामा दिल्याने सत्तांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Nepal Protest
Nepal ProtestSarkarnama
Published on
Updated on

Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घातल्याने व भ्रष्टाचाराविरोधात तेथील युवक आक्रमक झाले आहे. सोमवारी संतप्त युवकांनी राजधानी काठमांडूमध्ये हिंसक निदर्शने करत संसदेच्या आवारात घुसखोरी केली. शाळकरी मुलांसह हजारो युवकांनी (जेन -झी) बॅनरखाली निर्दशने केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला आहे. आज मंगळवार (दि.९) तरुणांचा उद्रेक आणखी वाढला आहे. संतप्त युवकांनी आज नेपाळची संसदच पेटवली.

सोशल मीडियावर लावण्यात आलेल्या बंदीविरोधात तरुणांनी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आंदोलकांनी नेपाळ सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थांनांवर हल्ले केल्यानंतर आता आंदोलकांनी संसदेवर कब्जा करत संसद पेटवून दिली आहे. तरुणांचा वाढता उद्रेक पाहाता मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. उपचाराचे कारण देत केपी ओली हे दुबईत पळ काढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. हिंसा वाढल्याचे पाहाता नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.

नोंदणी प्रक्रियेचे पालन न केल्याचे कारण देत नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअप आणि एक्स सह २६ सोशल माध्यमांवर बंदी लागू केली. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदी घालण्यात आल्याचं सरकारने सांगितलं. परंतु नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर घाला घालण्यासाठी सरकारने बंदी घातल्याचे म्हणत युवकांनी आंदोलन सुरु केलं. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली. तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य पसरलं आहे.

Nepal Protest
Nepal Political Crisis : शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान! तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर काय काय घडलं?

सोमवारी हिंसाचारानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचं जाहीर करुनही तरुणांचा राग शांत झालेला नाही. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह नेपाळच्या गृहमंत्री, आरोग्य मंत्री, कृषिमंत्र्यांसह दहा मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा करत तिथेही तोडफोड व नासधूस केली. घरातल्या अनेक गोष्टी आंदोलकांनी लुटून नेल्या. दरम्यान उर्जामंत्री दीपक खडकांच्या घराबाहेर आंदोलकांनी नेपाळी चलनाच्या नोटा उधळल्या.

Nepal Protest
Sudan Gurung News : मुलाच्या मृत्यूने हादरा अन्..! नेपाळचे सरकार उलथवून टाकणारा युवा नेता कोण?

पंतप्रधान ओलींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये सत्तांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बालेन शाह यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. एक तरुण चेहरा म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जात असून ते नेपाळी रॅपर, म्युजिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत. लष्कराने नेपाळची सूत्रे हाती घेतल्यानंतर बालेन शाह यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com