Pakistan Vs USA : ट्रम्प यांना पाकने दिला सर्वात मोठा धोका; शाही मेजवानीनंतरही थेट कट्टर शत्रूची साथ देत ठणकावले...

Pakistan’s Response to the US Military Strike : अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
Pakistani officials express strong support for Iran, condemning the US airstrike as a violation of international legal norms.
Pakistani officials express strong support for Iran, condemning the US airstrike as a violation of international legal norms. Sarkarnama
Published on
Updated on

Why Pakistan Supports Iran in This Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराण आणि इस्त्राईलमधील संघर्षामध्ये पहिल्यांदाच तिसऱ्या देशाच्या सहभागाने जगातील अनेक देशांनी पहिल्यांदाच उघडपणे चिंता व्यक्त केली आहे. या देशांमधील अमेरिकेसाठी महत्वाचे नाव म्हणजे पाकिस्तान. ट्रम्प यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. अमेरिकेच्या एअरस्ट्राईकमुळे आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्व नियमांचे उल्लंघन झाले आहे. संयुक्त राष्ट्र चार्टरनुसार इराणकडे आपली सुरक्षा करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्य पूर्व आशियातील तणावपूर्ण स्थितीविषयी पाकिस्तानने चिंता व्यक्त केली आहे. सध्याची स्थिती खूप चिंताजनक असून यामुळे मध्य पूर्ण भागात याचा भयानक प्रभाव पडेल. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून इराणकडे सुरक्षेचे पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत एकप्रकारे पाकिस्तानने अमेरिकेला ठणकावले आहे.

Pakistani officials express strong support for Iran, condemning the US airstrike as a violation of international legal norms.
PM Modi on US Attack : अमेरिकेने खळबळ उडवून देताच इराणची मोठी खेळी; 45 मिनिटांची चर्चा अन् ट्रम्प यांना झटका?

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासाठी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी शाही मेजवानीचे आयोजन केले होते. त्यानंतर आय लव्ह पाकिस्तान म्हणत त्यांनी पाकसोबत आपली मैत्री घट्ट असल्याचा सूचक संदेश इराणसह जगाला दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने ट्रम्प यांची थेट शांततेच्या नोबेलसाठी शिफारसही करून टाकली होती. पण काही तासांतच पाकने ट्रम्प यांनी जोरदार झटका दिला आहे.

Pakistani officials express strong support for Iran, condemning the US airstrike as a violation of international legal norms.
US Vs Iran : ट्रम्प यांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली; इराण चवताळून उठला, अमेरिकेला परिणाम भोगावे लागणार...

इराण आणि पाकिस्तानमध्ये 900 किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळे दोन्ही देशांसाठी एकमेकांचे सहकार्य महत्वाचे मानले जाते. पाकने यापूर्वीच दोन्ही देशांमध्ये चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत उघडपणे इराणची बाजू घेतली नव्हती. पण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर थेट निषेध करण्याची भूमिका पाकिस्तानने घेतली आहे.

दरम्यान, इराणला रोखण्यासाठी अमेरिकेसाठी पाकिस्तानची भूमी महत्वाची आहे. पाकने सहकार्य केल्यास तेथील हवाईतळांचा वापर करून इराणवर नियंत्रण ठेवणे अमेरिकेसाठी सहज शक्य होऊ शकते. पण पाकच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता ट्रम्प पाकिस्तानविषयी काय भूमिका घेणार, याबाबत भारतासह संपूर्ण जगाची उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com