
Nagpur News: मराठा नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आरक्षणासाठी सुरु केलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर मराठा समाजाच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निर्णयाविरोधात ओबीसी समाज कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
एकीकडे महायुती सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या सराटी अंतरवालीसह नागपूरमध्येही ओबीसी बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात जी तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाची दखल भाजपनं घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता.4) आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात जी तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाची दखल भाजपनं घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (ता.4) आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी माहिती दिली आहे. OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार असून OBC समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी येऊन सरकारच्या नव्या अध्यादेशाविषयी स्पष्टता द्यावी, अशी राष्ट्रीय OBC महासंघाची प्रमुख मागणी आहे.
मराठा समाजाला OBC अंतर्गत आरक्षण देऊन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आणि इतर मागण्याही समोर आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आणि आश्वासनानंतर हे साखळी उपोषण स्थगित होण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या या भेटीमुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची आशा आहे.
ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी थेट सरकारविरोधातच दंड थोपटले आहे. त्यांनी सरकारने काढलेल्या आदेशावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. भुजबळ यांनी सरकार असा निर्णय घेईल, याची अपेक्षा नव्हती म्हणत उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी आम्ही सरकारच्या या जीआरविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही दिला. कोण हरलं का कोण जिंकलं? याचा आम्ही विचार न करता आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.