Nishikant Dubey Controversial Statement : भाजप खासदाराकडून मराठी अन् महाराष्ट्राचा अपमान; वादग्रस्त दुबेंनी सरन्यायाधीश अन् निवडणूक आयुक्तांनाही सोडलं नव्हतं!

Nishikant Dubey Former CEC Chief Justice : दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या सर्वोच्च न्यायालायाने दखल घेत त्यांच्याविरोधात केस दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Nishikant Dubey
Nishikant Dubeysarkarnama
Published on
Updated on

Nishikant Dubey VS MNS : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा अपमान होईल, असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले, 'तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यात जा तुम्हाला आपटून मारू. तुम्ही असं काय करताय की मराठी बोलावं लागेल? तुम्ही आमच्या पैशावर जगता. तुम्ही आमचं शोषण करून कर भरता.'

महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबे यांनी सर्वोच्च न्यायालायाचे सरन्यायाधीश तसेच निवडणूक आयोगाच्या माजी आयुक्तांना देखील सोडले नव्हते. त्यांनी यांच्या विषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केली होती. ती पुन्हा चर्चेत आली आहेत.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविषयी सर्वोच्य न्यायायाने निर्णय देताना काही सुधारणा लगेच लागू करण्यास निर्बंध घातला होता. यावर याचिकाकर्ते व सरकारचे म्हणणे सर्वोच्य न्यायालयाने सादर करण्यास सांगितले होते. त्यावरून दुबे म्हणाल होते की, न्यायालय आपली मर्यादा ओलांडत आहे. जर देशात गृहयुद्ध झाले तर त्याला सरन्यायाधीश जबाबदार असतील.'

दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या सर्वोच्च न्यायालायाने दखल घेत त्यांच्याविरोधात केस दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Nishikant Dubey
Changur Baba: रस्त्यावर अंगठ्या विकणारा 100 कोटींचा मालक; आलिशान बंगला, मोटारी; ED करणार चौकशी, कोण आहे छांगुर बाबा

निशिकांत दुबे यांनी माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी यांच्यावर देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. कुरैशी यांनी वक्फ बोर्डा विधेयकावर मत व्यक्त केल्यानंतर दुबे म्हणाले होते की, कुरैशी हे निवडणूक आयुक्त नव्हते तर ते फक्त मुस्लिम निवडणूक आयुक्त होते.

भाजपची भूमिका काय?

महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबे यांनी मागे केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यांच्या विरोधात भाजपने काही ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. ही मते त्यांची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही, अशी विधान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती.

Nishikant Dubey
Narhari Zirwal : असं काय म्हणाले झिरवळ?संपूर्ण सभागृहात आलं हास्याचं वादळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com