
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच आज सत्ताधारी आमदारच सरकराविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना आमदार आमशा पाडवी (अक्कलकुवा मतदारसंघ) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर वातावरण तापतं होतं. पण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे येथील वातावरण हलकं-फुलकंही झालं. ते स्वत: मंत्री असतानाही आमदार पाडवी यांना एकदा नव्हे तर दोनदा ‘मंत्री महोदय’ म्हटल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला! सध्या याचीच चर्चा राज्यभर होताना दिसत आहे. (Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal mistakenly calls Shiv Sena MLA Amishya Padvi 'Minister Mahoday' twice during the Monsoon Session)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असतानाच विधानसभेत आज सत्ताधारी आमदार आणि सरकार असा समना पाहायला मिळाला. अक्कलकुव्याचे शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी तेल भेसळीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. ज्याला झिरवळ यांनी उत्तर दिले.
पाडवी यांनी तेल भेसळीच्या मुद्द्यावरून, तालुक्यात टँकर फॅक्टरीत लावून तेल भेसळ होत आहे. जे माझा मतदारसंघात येणाऱ्या पूर्णपणे आदिवासी जिल्हा असणाऱ्या नंदुरबारला येत आहे. यामुळे येथे लोकांना कर्करोगासह गंभीर आजार होताना दिसत आहे. तक्रार केल्यावर 25 लाखांचा माल जप्त झाला. पण नंतर काय तर ते चांगलं होतं म्हणून परतही करण्यात आलं. पण आता अशा गोष्टीवर कारवाई होणार का? असा सवाल केला होता.
यावर झिरवळ यांनी उत्तर देताना, पाडवींचा उल्लेख ‘मंत्रीमहोदय’ असा केला. घाई-गडबडीत एकदा असे झालं असेल असे मानलं तरी त्यांनी दुसऱ्यांदाही पाडवी यांचा ‘मंत्रीमहोदय’ असा उल्लेख केला. यामुळे सभागृहात कुजबूज आणि हशा पिकला.
उत्तर देत पहिल्यांदा झिरवळ यांनी “मंत्रीमहोदयांनी विचारलेला प्रश्न खरा आहे”, असं म्हटलं. त्यावर सदस्यांनी तुम्हीच मंत्री आहात असा टोला लगावला. त्यावर झिरवळांनी ‘सॉरी’ म्हणत चूक कबूल केली. पण त्यानंतर पुन्हा त्यांनी, अध्यक्ष महोदय, मंत्रीमहोदयांनी विचारलेला प्रश्न.. असे म्हणताच उपस्थिती सदस्यांमध्ये गलका उडाला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील झिरवळ यांची फिरकी घेत जरा थांबा, भूमिकेत यायला त्यांना थोडा वेळ द्याल की नाही, असा सवाल सदस्यांना केला. तसेच हसणाऱ्या सदस्यांनाही दाद दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.