Nitish Kumar News : 'वक्फ'मुळे नितीश कुमारांना पहिला धक्का; पक्षातील बड्या नेत्याचा राजीनामा

Waqf Bill Bihar, JDU leader resigns : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचे टेन्शन वाढणार असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे.
 Nitish Kumar
Nitish Kumarsarkarnama
Published on
Updated on

Bihar News : लोकसभेत गुरूवारी रात्री वक्त सुधारित विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी मतदान केले. राज्यात पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होत असल्याने हे विधेयकाबाबत पक्षाची भूमिका महत्वाची मानली जात होता. आता विधेयक मंजूर होताच पक्षातील मुस्लिम नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचे टेन्शन वाढणार असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे. पक्षातील अनेक मुस्लिम नेत्यांनी विधेयकाला समर्थन दिल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर होताच ही नाराजी उफाळून आली असून गुरूवारी एका नेत्याने राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.

 Nitish Kumar
Waqf Bill News : ‘वक्फ’वरून उद्धव ठाकरे फाडफाड बोलले, काही वेळात राऊत राज्यसभेत कडाडले!

पक्षातील वरिष्ठ नेते डॉ. मोहम्मद कासिम अन्सारी यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी नितीश कुमार यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. देशभरातील मुस्लिमांना तुमची धर्मनिरपेक्ष विचारधारा असल्याचा विश्वास होता. पण आता हा विश्वास उडाला आहे. वक्फ विधेयकावरील पक्षाच्या भूमिकेमुळे मुस्लिम आण कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला आहे, असे अन्सारी यांनी म्हटले आहे.

अन्सारी यांच्याआधीही काही मुस्लिम नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली होती. अनेक नेत्यांनी नितीश कुमारांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी मुस्लिमांचे हितांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच सरकारला तीन सुचनाही केल्या होत्या. सरकारने त्या सुचनाही स्वीकारल्या. पण अजूनही नेत्यांची नाराजी दूर झाली नसल्याचे चित्र आहे.

 Nitish Kumar
Rajya Sabha Session : बहारों फूल बरसाओं, मुझे तुमसे प्यार था..! सीतारमण यांनी खासदारांच्या गाण्याचा विषय काढला अन्...

वक्फच्या मुद्दयावर पक्ष सोडणारे अन्सारी हे पहिले नेते ठरले आहेत. आणखी काही मुस्लिम नेते व पदाधिकारी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. त्यामुळे पुढील काळात काही राजीनामे येऊ शकतात, अशी पक्षाला भीती आहे. त्याचा निवडणुकीतही पक्षाला फटका बसू शकतो. विरोधकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फचा मुद्दा प्रचारात आणला जाणार, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नितीश कुमारांची कोंडी होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com