Noida Protest Violence : पगारवाढीसाठी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन चिघळलं; 'फेज 2' मध्ये वाहने पेटवली, पोलिसांसह कंपनीवर दगडफेक

Noida Employee Salary Hike Clash : फेज 2 मधील काही कंपन्यांमधील कर्मचार्‍यांची मागील अनेक महिन्यांपासून व्यवस्थापनाकडून पगारवाढीची मागणी फेटाळली जात आहे. शिवाय कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे.
Noida Protest Violence | Employee Salary Hike Clash
Employees protest in Noida Phase 2 demanding salary hike, with unrest escalating into violence and vehicles set ablaze during the Noida protest.Sarkarnama
Published on
Updated on

Noida Protest Violence : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राजधानी दिल्लीजवळ नोएडा फेज-2 परिसरातील खासगी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांनी मागील तीन दिवसांपासून सुरू केलेल्या धरणे आंदोलन आज सकाळी अचानक हिंसक वळण लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पगारवाढीच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली होती. मात्र, कर्मचार्‍यांचा जमाव अचानक हिंसक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत त्या पेटवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दिल्ली एनसीआरमधील नोएडा परिसरातील फेज 2 मधील काही कंपन्यांमधील कर्मचार्‍यांची मागील अनेक महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाकडून पगारवाढीची मागणी फेटाळली जात आहे. शिवाय कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं.

Noida Protest Violence | Employee Salary Hike Clash
Vijay Thalapathy : प्रचारावेळी थलपती विजय यांच्या अंगावर फेकला हार, सायकल सोडून पळत सुटले; नेमकं काय घडलं रॅलीत?

सोमवारी सकाळी देखील मोठ्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. मात्र, त्यांचं म्हणणं कोणी ऐकून घेत नसल्याने, सगळे कर्मचारी संतप्त झाले आणि त्यांनी कंपनीवर दगडफेक करायला सुरूवात. यावेळी काही आंदोलकांनी कार व बसेसना आग लावली.

पोलिसांनी तात्काळ या आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त आंदोलकांनी थेट पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत काही वाहन उलटवली. परिस्थिती चिघळल्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Noida Protest Violence | Employee Salary Hike Clash
Ashok Kharat Case : खरातचा तुरूंगातील स्टेटस काय? मुलाच्या आठवणीत व्याकुळ; जेवणही कमी, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीच्या मागण्यांसाठी हे कर्मचारी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. आपापल्या कंपनी विरोधात हे कर्मचारी घोषणाबाजीही करत होते. पण जेव्हा काही आंदोलकांनी थेट दगडफेक आणि वाहनांना आगी लावण्याचे प्रकार सुरू करताच आंदोलन चिघळलं.

दरम्यान, पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. शिवायकोणत्याही प्रतारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com