North Block fire scare : संसदेजवळील नॉर्थ ब्लॉकमध्ये आग; धुराचे लोट, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

Delhi Fire News: दिल्लीतील संसदेजवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. धुराचे लोट दिसत असून अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Delhi Fire News
Delhi Fire NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संसदेजवळ असलेल्या नॉर्थ ब्लॉक इमारतीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे दाट लोट दिसून आले. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला आगीची माहिती मिळाल्यानंतर 6 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार, आग नियंत्रणात आणण्यात आली आहे.

नॉर्थ ब्लॉकच्या छतावरील एसी यंत्रणेच्या बॉयलरमध्ये आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. इमारतीच्या छतावर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Delhi Fire News
Devendra Fadnavis : मोठी बातमी! जरांगेंनी आरोप केलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ प्रकरणी अखेर SIT स्थापन; फडणवीसांची घोषणा

दिल्ली अग्निशमन दलाला नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्य आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आगीमुळे इमारतीत किंवा परिसरात किती नुकसान झाले, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com