
Navi Delhi News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा चेहरा मॉर्फ करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने हा अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी मोठा कारवाई केली असून बिहारच्या गोपाळगंजमधून दोघांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे मुलगा आणि बाप आहे. या दोघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींची ओळख मोहिबुल हक आणि त्याचा मुलगा गुलाब जिलानी अशी आहे. तर या दोघांनी 'एसएस रिअल पॉइंट' नावाच्या यूट्यूब चॅनलवर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा चेहरा मॉर्फ अश्लील व्हिडिओ तयार करने आणि तो अपलोड केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओवरून हरियाणाच्या गुरुग्राम सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून एआयचा गैरवापर करून शहीद कुटुंबांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
त्यानंतर बिहार पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता आरोपींनी असे बरेच व्हिडिओ बनवले आणि ते शेअर केल्याचे समोर आले आहे. याच्याआधी देखील त्यांनी असा प्रकार करून अनेकांना लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान हरियाणा पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असून या गुन्हात फक्त या बाप-लेकांचा समावेश असू शकत नाही. तर या गुन्ह्यात एक मोठे नेटवर्क असू शकते असाही पोलिसांना संशय आहे. सध्या याचा तपास डिजिटल फॉरेन्सिक पथकाद्वारे केला जात असून आरोपींचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
गुरुग्राम पोलिसांच्या या कारवाईला गोपाळगंज पोलिसांनी दुजोरा दिला असून याची माहिती बिहार पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर दिली आहे. याबाबत गोपाळगंजचे पोलीस अधिक्षक अवधेश दीक्षित यांनी, एक हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने यूट्यूब चॅनेल ट्रॅक केले असून आरोपींची ओळख पटवून कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही असे अनेक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस आरोपींवर कारवाई करतात, मात्र नवनव्या तंत्रज्ञानामुळे या आरोपींना पकडणे एक आव्हान बनल्याची कबुलीही पोलिसांनी दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केला होता. ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात हरियाणातील करनाल येथील लेफ्टनंट विनय नरवाल (वय 26) यांचा समावेश होता. विनय नरवाल यांचा 16 एप्रिल 2025 रोजी लग्न झाले होते. ते येथे हनिमूनसाठी गेले होते. पण या दहशतवादी हल्ल्यात विनय नरवाल मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतरच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले होते. ज्यात 100 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारतीय लष्कराने ही कारवाई पाकिस्तामधूल बहावलपूर आणि मुरीदके येथील 9 दहशतवादी तळांवर केली. हे तळ उद्ध्वस्त केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.