Operation Lotus Failed : पश्चिम बंगालमधील ऑपरेशन लोटस फेल, अमित शाहांना मोठा धक्का! टीएमसीच्या खासदाराने जाहीरपणे सांगितले

TMC Kirti Azad Targets Amit Shah : पश्चिम बंगालमध्ये टीएमसीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. मात्र, खासदारांमध्ये फूट पाडण्यास भाजप यशस्वी ठरत नसल्याचे खासदार किर्ती आझाद यांनी सांगत ऑपरेशन लोटस यशस्वी होत नसल्याचे म्हटले आहे.
Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Amit Shah, Narendra Modi, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

TMC News : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. तब्बल 58 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्याच्या मागे पडद्यामागून भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा आरोप होत आहे. ममता बॅनर्जींचे एक एक खासदार फुटत असल्याचे सांगितले जात आहे.

टीएमसीची लोकसभेतील खासदारांची संख्या 28 आहे. मात्र, जर मोठा गट फूटून बाहेर पडला तरी त्याच्या मान्यतेसाठी ती संख्या दोन तृतीयांश असली पाहिजे. म्हणून जर 28 पैकी 19 खासदार फूटले तरच फुटीर गटाला मान्यता मिळेल अन्यथा ते अपात्र ठरतील.

यावरून टीएमसीचे खासदार किर्ती आझाद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सध्या तरी ऑपरेशन लोटस हे यशस्वी होताना दिसत नाही. भविष्यात काय होईल हे माहीत नाही. मात्र, फुटणाऱ्या सदस्यांची संख्या सध्या 16 च्या पुढे जात नाही.

ते म्हणाले, अमित शाहांच्या देखरेखीखाली ऑपरेशन लोटस जोरात सुरू आहे. वेगवेगळी नावे फूटत असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. मात्र, नक्कीच त्यांच्याकडे 16 नावं देखील नाहीत.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
TMC MP Resign: तृणमूलचा आणखी एक खासदार गळाला! कोणी दिला रजीनामा? आता ममतांचे निष्ठावंत किती राहिले?

दबावाचे राजकारण

किर्ती आझाद यांनी आरोप केला की, खासदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांच्या निवास्थानी, कार्यालयात पोलिस ठाणे मांडून आहेत. दरम्यान, ज्या खासदार फुटल्या डाॅ.काकोली घोष यांच्यावरून त्यांनी अमित शाहांना देखील टोला लगावला. ते म्हटले, ज्या पाच लाख रुपये घेताना (नारद स्टिंग) कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. त्याच तुमच्या भांगेतील उधारचे सिंदूर आहेत.

Amit Shah, Narendra Modi, Mamata Banerjee
Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशची राज्यसभा निवडणूक एकतर्फी नाहीच! नटराजन यांच्या याचिकेची सुप्रीम कोर्टानं घेतली दखल; उद्याच होणार फैसला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com