BJP News : माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकात ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकते, असे भाकित वर्तविले होते. पण कर्नाटकच्या राजकारणात सध्या ऑपरेशन पंजा होणार की काय, या चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या भोजन समारंभात भाजपचे तीन आमदार सहभागी झाले होते. याची भाजप प्रदेशच्या नेत्यांनीही गंभीर दखल घेतली आहे.
आमदार एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बर आणि विधान परिषदेचे आमदार एच. विश्वनाथ ही भाजप (BJP) आमदारांची नावे आहेत. बेंगलुरू येथे बुधवारी रात्री काँग्रेस (Congress) आमदारांच्या बैठकीनंतर सर्वांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला तीन आमदारांनी उपस्थिती लावल्याने भाजप नेत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Operation Panja News)
तीनही आमदार भाजप सरकारमध्ये मंत्री होते. आगामी लोकसभा निवडणुकीआधी हे तिघे काँग्रेसमध्ये सहभागी होऊ शकतात, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. भाजपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच हे तिघे पक्षापासून दुरावले असल्याची चर्चाही आहे. २०१९ मध्ये काँग्रेस व जेडीएस मधून भाजपमध्ये गेलेल्या १९ आमदारांमध्ये तिघांचा समावेश होता. या ऑपरेशन लोटस नंतर राज्यात भाजपचे सरकार आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोमशेखर आणि हेब्बर हे भाजप सरकारमध्ये मंत्री होते. ते मुळचे काँग्रेसमधील आहेत. तर विश्वनाथ हेही मुळचे काँग्रेसचे असले तरी भाजपमध्ये जाण्यापुर्वी जेडीएस दाखल झाले होते. या तिघांच्या जेवणावळीची माहिती समोर आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. येडियुरप्पा यांनी त्यांची गंभीर दखल घेतली आहे.
यावर बोलताना येडियुरप्पा म्हणाले, मला याबाबत सकाळी माहिती मिळाली. मी त्यांचीशी बोलून याबाबत खुलासा मागणार आहे. तिथे जाण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, याची माहिती घेतली जाईल. हा खूप गंभीर मुद्दा आहे.
काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, मी स्वतंत्रपणे भोजन समारंभाचे आयोजन केले होते. त्यासाठी इतर पक्षातील नेत्यांनाही आमंत्रित केले होते. त्यामुळे त्या तिघांसह जवळपास दहा नेते सहभागी झाले होते. ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत. ते बैठकीला कशाला येतील? ते बैठकीला आले नव्हते, केवळ जेवणाला आल होते.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.