NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? पुण्यात 10 जूनला सगळं स्पष्ट होणार...

Possibility of NCP Merger: What’s at Stake? : पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच एक बैठक झाली.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्रित येतील, अशी शक्यता धूसर झाली आहे. उलट दोन्ही पक्षांनी एकामेकांना आपली ताकद दाखवण्यासाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे.

पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीमध्ये एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, अशी माहिती इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मोठ्या ग्रँड आयोजनासह यंदाचा वर्धापनदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
IPS अधिकाऱ्यानं लिहिलं आयटम साँग; ‘शोर मचा’ म्हणणारे हे महानिरीक्षक कोण?

हा कार्यक्रम केवळ वर्धापनदिन नसून, एक प्रकारचं शक्तिप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे. विविध जिल्ह्यांमधून कार्यकर्त्यांची मोठी फौज पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. बालेवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमात अजित पवार स्वतः उपस्थित राहून आगामी राजकीय दिशा स्पष्ट करणार आहेत.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील १० जून रोजी पुण्यातच वर्धापन दिन साजरा करणार असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. राष्ट्रवादीमधील मूळ विचार आणि नेतृत्व आमच्याकडेच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. एकाच शहरात, काही अंतराने होणारे हे दोन कार्यक्रम म्हणजे एकप्रकारचं "राजकीय शीतयुद्ध" होणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Gopinath Munde : …अन् गोपीनाथ मुंडे बनले डॅशिंग गृहमंत्री! ‘त्या’ पबवरील थरारक रेड ठरली कारणीभूत... 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन १० जूनला बालगंधर्व रंगमंदिर येथे साजरा होणार असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबत पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन कार्यकर्त्यांना प्रचंड बळ देणारा ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com