A K Singh : ऑपरेशन सिंदूरसारखी मोठी मोहीम होऊ शकली त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे राजकीय....; हवाईदल प्रमुखांचं महत्वाचं विधान

A K Singh : भारतानं पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्ध थांबवलं ते बरंच केलं, असंही हवाई दल प्रमुखांनी म्हटलं आहे.
Air Chief Marshal  AK Singh
Air Chief Marshal AK Singh
Published on
Updated on

A K Singh : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं केलेली मोठी कारवाई म्हणजे ऑपरेशन सिंदूर. या मोहिमेच्या यशस्वीतेमागं अनेक महत्वाची कारणं होती. पण त्यांपैकी एक म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, असं महत्वाचं विधान हवालदल प्रमुख एअरचीफ मार्शल ए. के. सिंग यांनी केलं आहे. बंगळुरु येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या मोहिमेमागच्या अनेक गोष्टी कशा काम करत होत्या, याची माहिती दिली तसंच पाकिस्ताननं युद्ध का थांबवलं? भारतानं ही मोहीम थांबवण्याचा घेतलेला निर्णय का योग्य होता? हे देखील सांगितलं आहे.

एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं एक प्रमुख कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. आम्हाला अगदी स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आमच्यावर कोणतेही बंधनं लादण्यात आली नव्हती. जर काही बंधनं असतील तर ती आम्ही स्वतःच घालून घेतली होती. आम्ही हे युद्ध कुठंपर्यंत आणि किती वाढवायचं हे ठरवलं. आम्हाला नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. आमचे हल्ले कॅलिब्रेट केले गेले कारण आम्हाला त्याबद्दल हुशारीनं निर्णय घ्यायचा होता. तिन्ही दलांमध्ये चांगला समन्वय होता. यासाठी सीडीएस या पदाचा चांगला फायदा झाला. आम्हाला एकत्र आणण्याचं काम सीडीएस यांनी केलं. त्याचबरोबर सर्व सुरक्षाविषय एजन्सींना एकत्र आणण्यात NSA नं देखील मोठी भूमिका बजावली होती"

Air Chief Marshal  AK Singh
Sharad Pawar : 'दोघे भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली...', शरद पवारांचा गोप्यस्फोट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मुरीदके-एलईटी मुख्यालयावरील हल्ल्याच्या आधी आणि नंतरचे फोटो दाखवताना, ए पी सिंग म्हणतात, "हे दहशतवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांचं निवासी क्षेत्र आहे. ही त्यांची कार्यालयीन इमारत होती, जिथं ते बैठका घेण्यासाठी एकत्र येत असत. हे ठिकाण रेंजमध्ये असल्यानं आम्हाला शस्त्रांचे व्हिडिओ मिळू शकले. आमच्या हवाई संरक्षण प्रणालींनी यामध्ये उत्तम काम केलं आहे. आम्ही अलीकडेच खरेदी केलेली एस ४०० प्रणाली गेम-चेंजर ठरली आहे. या प्रणालीच्या रेंजनं त्यांच्या विमानांना त्यांच्या शस्त्रांपासून खरोखर दूर ठेवलं, जसं की त्यांच्याकडं असलेले लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब, ते वापरू शकले नाहीत कारण ते सिस्टममध्ये प्रवेशच करू शकले नाहीत"

"आपण त्यांची किमान पाच लढाऊ विमानं पाडली आहेत ज्यांची पुष्टी केली गेली आहे. तसं एका मोठ्या विमानाचीही यात समावेश आहे. जे एकतर ELINT विमान किंवा AEW &C विमान असू शकते, जे सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर पाडलं गेलं होतं. प्रत्यक्षात हे आतापर्यंतचे सर्वात मोठं रेकॉर्ड केलेले जमिनीवरून हवेत मारले जाणारे किल आहे ज्याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो. शहबाज जेकबाबाद एअरफील्ड, हल्ला झालेल्या प्रमुख एअरफील्डपैकी एक आहे. इथं एक F-16 हँगर आहे. हँगरचा अर्धा भाग गेला आहे आणि मला खात्री आहे की, आता काही विमानं होती जी तिथे खराब झाली आहेत. आम्हाला मुरीद आणि चकलाला सारखी किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर्स मिळू शकली. किमान सहा रडार, त्यापैकी काही मोठे, काही लहान... आम्हाला त्या AEW&C हँगरमध्ये किमान एक AEW&C आणि काही F-16 विमानांचे संकेत मिळाले आहेत, जे तिथं देखभालीखाली होतं. आमच्याकडं किमान पाच फायटर किल्सची पुष्टी आहे आणि एक मोठे विमान आहे, जे एकतर ELINT विमान किंवा AEW&C विमान असू शकते, जे सुमारे 300 किलोमीटर अंतरावर घेतले गेले. हे प्रत्यक्षात जमिनीवरून हवेत मारले जाणारे आतापर्यंतचे सर्वात मोठे किलविमान आहे"

Air Chief Marshal  AK Singh
Ajit Pawar: कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय! सगळा मक्ता मीच घेतला का? अजितदादांचा रोख नेमका कोणाकडे?

पाकिस्तानसोबत झालेलं हे एक हायटेक युद्ध होतं. ८० ते ९० तासांच्या युद्धात, आम्ही इतके नुकसान करू शकलो की त्यांना हे स्पष्ट झाले की जर ते असेच चालू राहिले तर त्यांना याची अधिकाधिक किंमत मोजावी लागेल. त्यामुळं ते पुढे आले आणि त्यांनी आमच्या डीजीएमओला संदेश पाठवला की त्यांना बोलायचे आहे. त्यानंतर आपच्या बाजूनं हे स्वीकारण्यात आलं. सरगोधा, आम्ही आमच्या हवाई दलात वाढलो आहोत, अशा दिवसांची स्वप्ने पाहत असतो, कधीतरी आम्हाला तिथं जाण्याची संधी मिळेल. त्यामुळं निवृत्त होण्यापूर्वीच मला संधी मिळाली, म्हणून आम्ही तिथे एअरफील्ड स्वीकारलं.

"या युद्धात लोक त्यांच्या अहंकाराला बळी पडले... एकदा आपण आपले उद्दिष्ट साध्य केलं की, आपण थांबण्यासाठी सर्व संधी शोधायला हव्यात. माझ्या अगदी जवळच्या काही लोकांनी मला म्हटलं की, 'और मारना था' पण आपण युद्ध चालू ठेवू शकतो का?...उलट हे युद्ध थांबवण्यासाठी भारतानं एक चांगला निर्णय घेतला आहे," असे ऑपरेशन सिंदूर थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com