Ajit Pawar: कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय! सगळा मक्ता मीच घेतला का? अजितदादांचा रोख नेमका कोणाकडे?

Ajit Pawar speaks on Pune Guardian Minister role: सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री या नात्याने पुण्यातील वृक्षतोड थांबवावी, अशी विनंती एकाने अजित पवार यांनी केली. त्यावर अजितदादांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता?
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुणे दौरा शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरु झाला, त्याचा समारोप चिंचवडमध्ये सांयकाळी झाला. सकाळी अजितदादांनी चाकण येथे वाहतूक कोंडीच्या मुद्यावरुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यावर संताप व्यक्त केला.तर सांयकाळी एका कार्यक्रमात त्यांना कार्यकर्त्यांने त्यांना वृक्षतोड थांबविण्याबाबत सूचना केल्या. त्यावर वैतागून मिश्किलपणे अजितदादांनी त्याला सुनावले.

कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, यांनी फक्त सल्ले द्यायचे!केवळ उपदेश करायचा, असे अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून अजितदादा चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा 66 वा वाढदिवस शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी अजितदादांनी तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.

Ajit Pawar
Maharashtra Politics: जनमताचा अनादर! महायुतीत वाढलाय बेबनाव; विरोधकही बेजबाबदार

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी यांनी पवना, इंद्रायणी,मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले आणि पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली. त्यावर अजितदादांनी त्यांना टोला लगावत उत्तर दिले. भापकर यांनी नदीकाठच्या आणि दुर्गा देवी टेकडीवरील वृक्षतोडीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

Ajit Pawar
Raksha Bandhan 2025: कोरे कोरे छान बँकबुकचे पान, हप्त्याचा योग दादा जुळवून आण!

अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण कार्याचं कौतुक केले. ते म्हणाले "आमचा संकल्प आहे दरवर्षी 25 कोटी झाडं लावण्याचा आणि सत्ताकाळात 100 कोटी झाडं लावून जतन करण्याचा. यामुळे पुढील 20 वर्षांत निसर्ग संवर्धनात यश मिळेल." "सयाजी आणि माझ्यात साधर्म्य आहे. स्पष्टवक्तेपणा आणि अस्सलपणा आम्हाला जोडतो," असं सांगत अजितदादांनी त्यांचे कौतुक केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com