Operation Sindoor : त्यांचा सुपडासाफ करा...! 'ऑपरेशन सिंदूर'वर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, भारतीय लष्कराचं केलं तोंडभरून कौतुक

India Surgical Strike : अखेर भारतीय लष्कराने सर्व भारतीयांची इच्छा पूर्ण केली आहे. पहलगाम येथील 26 पर्यटकांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना पोसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे सैन्य दलाने उद्धवस्त केले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथील 9 ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे.
Aditya Thackeray On Operation Sindoor
Aditya Thackeray On Operation SindoorSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pahalgam Terror Attack : अखेर भारतीय लष्कराने सर्व भारतीयांची इच्छा पूर्ण केली आहे. पहलगाम येथील 26 पर्यटकांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांना पोसणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे सैन्य दलाने उद्धवस्त केले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद येथील 9 ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक करत भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. या कारवाईनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया यायला सुरूवात झाल्या आहेत.

Aditya Thackeray On Operation Sindoor
Operation Sindoor: सर्वात मोठी बातमी! भारतानं अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; पाकिस्तानमध्ये घुसून 'करारा जवाब'; दहशतवादी अड्डे उध्वस्त

अनेक नेत्यांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील या भारतीय सैन्याच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी दहशतवादाचा सुपडासाफ केला पाहिजे असं म्हटलं आहे.

"सर्व प्रकारच्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन केलं पाहिजे. रात्री पीओकेमध्ये केलेले अचूक हल्ले दहशतवादाविरुद्ध आहेत आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय संरक्षण दलांचे कौतुक. त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की पुन्हा कधीही दहशतवादाला संधी मिळणार नाही."

Aditya Thackeray On Operation Sindoor
Operation Sindoor : घुसके मारा! पाकिस्तान विरूद्धच्या ऑपरेशनला 'सिंदूर' नाव देण्यामागे आहे भावनिक कारण

अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या सर्व भारतीयांच्या मनातील इच्छा सैन्य दलाने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक करून पूर्ण केल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.