
Role of Indian Air Defence and Counter UAS Systems : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला होता. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता हा तणाव टोकाला पोहचला असून दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. पाकने भारतातील उत्तर आणि पश्चिम भारतातील 15 लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले करण्याचा प्रय़त्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय लष्कराकडूनच याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार 7-8 मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारतातील लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामध्ये अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसहर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगढ, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज या लष्करी तळांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे हे हल्ले भारताने परतवून लावत ड्रोन आणि क्षेपणास्त्र नेस्तनाबूत केल्याची घोषण भारत सरकारकडून करण्यात आली आहे. यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे हल्ले परतवून लावल्याची माहिती सरकारने दिली आहे. या हल्ल्याच्या प्रयत्नांनंतर पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे तुकडे गोळा करण्यात आले असून पाकिस्तानी हल्ल्याचे ते पुरावे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत लाहोरसह ठिकठिकाणची एअर डिफेन्स रडार सिस्टीम उध्वस्त केली आहे. पाकिस्तानने ज्या तीव्रतेने हल्ला केला, तसाच प्रतिसाद भारतानेही दिल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार वाढविण्यात आला आहे.
प्रामुख्याने कुपवाडा, बारामुल्ला, उरी पूंछ, मेंधर आणि राजौरी भागात गोळीबार सुरू असल्याचेही भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 16 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामध्ये तीन महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. भारताकडून त्यालाही प्रत्युत्तर दिले जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.