Khawaja Asif News : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून तब्बल 9 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. या हल्ल्याने पाकिस्तान पुरता हादरून गेला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी पाकिस्तानने भारताचे पाच फायटर विमान पाठल्याचा दावा केला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना ख्वाजा असिफ यांनी भारताचे फायटर विमान पाडल्याचा दावा केल्या. त्यावर अँकरने पुरावे तुमच्याकडे काय आहेत? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सोशल मीडियावर फोटो फिरत आहेत, असे अजब उत्तर देत वेळ मारून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय सोशल मीडियावर ते फोटो फिरत असल्याचे हास्यास्पद विधान देखील असिफ यांनी केले.
आसिफ यांनी केलेल्या विधानावर अँकरने 'माफ करा पण सोशल मीडियावरील कंटेटबद्दल तुम्हाला बोलायला सांगितले नाही, असे म्हणत असिफ यांची बोलतीच बंद केली.' असिफ यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांनी पुरावे म्हणून दिलेले उत्तराची नेटिझन्सकडून खिल्ली उडवली जात आहे.
भारताची विमानं पाडण्यासाठी पाकिस्तानने कोणत्या विमानांचा वापर केला असा प्रश्न अँकरने केला असता त्याचे उत्तर ख्वाजा असिफ देऊ शकले नाहीत. तसेच चीन उपकरणं वापरली का? असा प्रश्न केला असता नाही चीन उपकरणं वापरली नाही पाकिस्तान स्वतः फायटर विमान तयार करतो, असे देखील असिफ म्हणाले. तसेच भारत रशिया आणि फ्रान्सकडून फायटर विमान आणि हत्यारं खरेदी करतो तर आम्ही देखील चीन, रशिया आणि ब्रिटनकडून विमानं खरेदी करू शकतो, असे असीफ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.