
Operation Sindoor Update : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केले. दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या हल्ल्यातून पाकिस्तान अजून सावरला नाहीच तो अवघ्य 24 तासांत पाकिस्तामध्ये साखळी बाॅम्बस्फोट झाले आहेत. पाकिस्ताने भारतावर आज हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे दाखवत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली.
पाकिस्तानातील सहा शहारातील 12 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानने दावा केला आहे की भारताने त्यांच्या हवाई क्षेत्रात 25 ड्रोन पाठवून हे हल्ले केले आहेत. गुजरनवाल, रावळपिंडी, कराची, लाहोर येथे झालेल्या स्फोटात चार जखमी जखमी तर एक जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ड्रोन हल्ल्यांमध्ये लाहोर, गुजरावाला, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, कराची, चोर आणि अटॉक या शहरांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी हे हल्ले म्हणजे पाकिस्तानवर उघड आक्रमण असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्यांचा बदला घेण्याची घोषणा केली आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना टार्गेट केले. लाहोर येथील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. भारतीय लष्कराने अधिकृतपणे पाकिस्तान भारता करत असलेल्या हल्ल्यात त्याच भाषेत उत्तर देण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.