Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या टोमण्यामुळे सत्ताधारी-विरोधक खळखळून हसले; म्हणाले,'माझ्या अन् पंतप्रधान मोदींच्या आयुष्यात पत्नीची...'

Women Reservation Bill: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता.17 एप्रिल) महिला आरक्षण विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी म्हणाले, महिला हा देशाचा एक प्रमुख घटक आहे. या संसदेतील आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात खूप काही गोष्टी महिलांकडून शिकत आलो आहोत. आई, बहिणी, पत्नी असं म्हणून ते काही क्षण स्तब्ध झाले.
Narendra Modi, Rahul Gandhi
Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारनं आणलेल्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संबंधित घटना दुरुस्तीच्या तीन महत्त्वाच्या विधेयकांवर संसदेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या विधेयकांवर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली.आक्रमक भाषण करतानाच त्यांनी केलेल्या एका टिप्पणीमुळे विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी बाकावरील नेतेमंडळीही खळखळून हसल्याचं समोर आलं आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता.17 एप्रिल) महिला आरक्षण विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधी म्हणाले, महिला हा देशाचा एक प्रमुख घटक आहे. या संसदेतील आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात खूप काही गोष्टी महिलांकडून शिकत आलो आहोत. आई, बहिणी, पत्नी असं म्हणून ते काही क्षण स्तब्ध झाले.

राहुल गांधी यांनी समोरच्या बाकावर बसलेल्या मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पाहत त्यांच्याच विधानाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्या स्वत:च्या आयुष्यात पत्नीचा तसा काही त्रास नाही. त्यामुळे आम्हाला त्यासंदर्भात माहिती नाही असं म्हणत केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे सर्व सभागृहातच हशा पिकला.

यानंतर राहुल गांधींनी आणखी महत्त्वाची बाब नमूद करताना बहीण प्रियांका गांधी यांच्या भाषणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टिप्पणी केली. ते म्हणाले,“काल मी इथे माझ्या बहिणीला बोलताना बघत होतो. तिनं अवघ्या 5 मिनिटांत असं काहीतरी साध्य केलं, जे मी माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत साध्य करू शकलो नाही. ते म्हणजे अमित शाह यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं. ही गोष्ट मलाही शिकून घ्यावी लागेल. तिचा मोठा भाऊ म्हणून मला खूप गर्व वाटत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं.

Narendra Modi, Rahul Gandhi
Amravati Paratwada case : शर्यत लागली अन् अयान, उझेरने अमरावतीत पटवल्या मुली : जिंकण्यासाठी VIDEO शेअर केल्याने झाला दोघांचाही गेम

तसेच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यावेळी केंद्र सरकारचं हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी नसून मतदारांचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न गंभीर आरोपही केला. ते म्हणाले भाजप हे विधेयक लागू करण्यासाठी 10-15 वर्षांचा वेळ घेत आहे, जर त्यांना खरोखरच आरक्षण द्यायचे असेल तर ते आता या क्षणापासून लागू करावे, असंही त्यांनी रोखठोकपणे सांगितलं.

भाजप निवडणुका जिंकण्यासाठी आणि आपली ताकद टिकवण्यासाठी दक्षिण भारतीय आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचाही हल्लाबोलही राहुल गांधींनी यावेळी केला.

तसेच मोदी सरकारवर घणाघात करताना राहुल गांधी यांनी देशातील राजकीय वातावरण पाहून तुम्ही घाबरत असल्याचा आरोपही केला. तुमची ताकद कमी होत असल्यामुळेच तुम्हाला निवडणूक नकाशा बदलायचा आहे. हेच तुम्ही आसाममध्ये केलं. पण आम्ही तुम्हाला निवडणूक नकाशा बदलू देणार नसल्याचा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

Narendra Modi, Rahul Gandhi
Sahar Shaikh News: 'कैसे हराया' फेम 'एमआयएम'च्या सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; 'नॉट रिचेबल' झालेले वडील दोन दिवसांत करणार मोठा धमाका

तसेच महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकासह मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष उभा राहिला आहे आणि तो हे विधेयक कधीही मंजूर करण्याचा तुमचा प्रयत्न हाणून पाडू असंही राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारला सुनावलं. तसेच आम्ही तुम्हाला ओबीसींचा अधिकार हिसकावू देणार नाही. तुम्ही त्यांना हिंदू म्हणवता. पण देशात त्यांना त्यांचा अधिकार देत नसल्याचा आरोपही गांधींनी सरकारवर केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com