LOC tension : दहशतवादी हल्ल्यानंतर बॉर्डरवर मोठी घटना; भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात

How PK Singh Was Captured by Pakistan Forces : बीएसएफचे कॉन्स्टेबल पी. के. सिंग यांना पाकिस्तानी सैन्यात पकडले आहे. सिंग हे बीएसएफच्या 182 बटालियनमध्ये सेवेत आहेत.
 BSF Constable PK Singh
BSF Constable PK SinghSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पंजामधील फिरोजपूर जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली आहे. संबंधित जवान ड्युटी करत असताना चुकून सीमा ओलांडली. त्यानंतर पाकिस्तान सैन्याने लगेच त्यांना ताब्यात घेतले.

बीएसएफचे कॉन्स्टेबल पी. के. सिंग यांना पाकिस्तानी सैन्यात पकडले आहे. सिंग हे बीएसएफच्या 182 बटालियनमध्ये सेवेत आहेत. झिरो लाईनवरील गेट क्रमांक 208/1 जवळ ते नियमित ड्युटी करत होते. जवळच्या शेतकरी शेतात काम करत होते. तिथूनच जात असताना उन्ह खूप असल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र, हे करत असताना त्यांच्याकडून चुकून सीमा ओलांडण्यात आली होती. त्याचवेळी पाकिस्ताने सैन्याने सिंग यांना ताब्यात घेतले.

 BSF Constable PK Singh
Indian Navy : पाकिस्तानचे मिसाईल बाहेर पडण्याआधीच भारताने दाखवली ‘डिस्ट्रॉयर’ची ताकद; अरबी समुद्रात हालचाल वाढली...

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉर्डरवर घडलेली ही पहिलीच मोठी घटना समोर आली आहे. मात्र, अशा घटना नियमित घडत असतात, असा दावा बीएसएफकडून करण्यात आल्याचे वृत्त दि संडे गार्डियनने बीएफएफमधील सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अपघाताने नागरिक किंवा जवान सीमापार जाण्याच्या घटना घडत असतात. भारताकडूनही पाकिस्तानी नागरिकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून परत पाठवले जाते, बीएसएफ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सिंग यांच्याबाबतही ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पाकिस्तानी सैन्याकडून आपल्या जवानाला लवकरच सोडले जाईल, अशी आशाही संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सिंग यांना परत आणण्यासाठी बीएसएफचे जवान घटनास्थळी पोहचल्याचे समजते. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांमध्ये ध्वज बैठक सुरू असल्याचे समजते. त्यानंतर सिंग यांची सुटका होईल.

 BSF Constable PK Singh
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून 'आरपार'च्या लढाईची घोषणा; म्हणाले, आता गाडण्याची वेळ...

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात राजकीय युध्द पुकारल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला असून त्यामुळे युध्दाची स्थिती निर्माण होऊ शकते, असे पाकिस्ताने म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारताने पाकिस्तानी नागिरकांचा व्हिसाही रद्द केला आहे. पाकिस्तानही भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com