India-Pakistan Tensions : करारा जवाब मिलेगा! ; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची 'या' भीतीपोटी चांगलीच तंतरली!

Overview of the Pahalgam Terror Attack : जाणून घ्या, पाकिस्तानाला आता नेमकी कोणती भीती वाटत आहे आणि त्यामुळे पाकिस्तान काय करत आहे?
India-Pakistan Tensions : करारा जवाब मिलेगा! ; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची 'या' भीतीपोटी चांगलीच तंतरली!
sarkarnama
Published on
Updated on

Pahalgam terror attack update : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या या कृत्यानंतर भारताचा संताप बघता पाकिस्तानची मात्र भीतीने अक्षरशा झोप उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने चुळबूळ सुरू केल्याचे दिसत आहे.

कारण, काल दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर रात्रभर पाकिस्तानच्या हवाई दलाची विमानं भारताच्या सीमेवर घिरट्या घालत होती. कदाचित पाकिस्तानलाही याची खात्री असणार की संतापलेला भारत या दहशतवादी हल्ल्याचा बदला नक्कीच घेणार. मागील इतिहास बघता अशा दहशतवादी घटनानंतर भारताने दिलेले सडेतोड उत्तर पाकिस्तानला धडकी भरवणारेच आहे.

India-Pakistan Tensions : करारा जवाब मिलेगा! ; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची 'या' भीतीपोटी चांगलीच तंतरली!
Kashmir Tourism Crisis : पहलगाम दहशतवादी हल्ला - 12 हजार कोटींचा पर्यटन व्यवसाय संकटात; अडीच लाख कश्मिरींच्या रोजगाराचा प्रश्न!

भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा जगासमोर टराटरा फाडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारत तशाचप्रकारे कारवाई करेल, असा पाकिस्तानचा अंदाज असावा म्हणूनच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीही या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगून पाकिस्तानचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. त्यात, आता भारताचे लष्करी सामर्थ्यही प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानची भीतीने पुरती तंतरल्याचे दिसत आहे.

India-Pakistan Tensions : करारा जवाब मिलेगा! ; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची 'या' भीतीपोटी चांगलीच तंतरली!
Pahalgam Terror Attack : चोराच्या उलट्या बोंबा! पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची धक्कादायक प्रतिक्रिया...

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या सर्वांनीच या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल आणि या मागे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना सोडणार नाही, असा कडक आणि सूचक इशारा दिलेला आहे. त्यावरून भारत आता नक्कीच गप्प बसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शिवाय, भारताने तिन्ही सैन्य दलास अलर्टमोडवरही ठेवलेले आहे.

India-Pakistan Tensions : करारा जवाब मिलेगा! ; दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर आता पाकिस्तानची 'या' भीतीपोटी चांगलीच तंतरली!
PM Modi Reaction on Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर मोदींची पहिली प्रतिक्रिया ; कडक इशारा देत, म्हणाले...

केवळ भारतच नव्हे तर अवघ्या जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही भारतासोबत असल्याचे जाहीर केले आहे. तर, रशिया, सौदी अरेबिया यासह अनेक देशांकडून या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या गेल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com