

Pakistan-Afganistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा करण्यात आला असून काबुल आणि नांगरहार इथं झालेल्या हल्ल्यात लहान मुलांसह ६ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. इराण-अमिरेका युद्धातच ही घटना घडल्यानं चिंतेचं वातावरण आहे. पाकिस्ताननं आपल्या दुसऱ्या शेजारी देशावर केलेल्या या हल्ल्यावर भारतानं प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याचा निषेध केला आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारच्या रात्री पाकिस्ताननं अफगाणिस्तावर हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तरही दिलं आहे. पाकिस्तानच्या कोहाट इथल्या सैन्य स्थळांवर अफगाण सैन्यानं निशाणा बनवलं आहे. अफगाणिस्तान सध्या सत्तेत असलेल्या तालिबान सरकारनं सांगितलं की, पाकिस्तानकडून काबूलमध्ये ज्या तेल डेपोवर हल्ला केला त्यातून अफगाणिस्तानसह संयुक्त राष्ट्रांची विमानं देखील इंधन घेत होते. चीननं या दोन्ही देशामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळं आठवड्याभरापूर्वीच दोन्ही देशांमधील संघर्ष थांबला होता पण आता पुन्हा एकदा पाकिस्ताननं हल्ला केल्यानं हा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यांबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "अफगाणिस्तानच्या भूभागात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारत तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांचा बळी गेला असून नागरी पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सार्वभौम अफगाणिस्तानच्या संकल्पनेबाबत कायमच शत्रुत्व बाळगणाऱ्या पाकिस्तानी व्यवस्थेकडून करण्यात आलेले हे आक्रमकतेचे आणखी एक कृत्य आहे. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा पूर्णपणे आदर केला गेला पाहिजे, या आपल्या भूमिकेचा भारत पुनरुच्चार करतो"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.