Pakistan Support To Terrorism: शाहबाज शरीफ यांची अतिशय चीड आणणारी घोषणा; पाकला कर्जात मिळालेले पैसे दहशतवाद्यांवर उधळणार! 1 कोटींची मदत...

India Vs Pakistan : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2.3 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. आयएमएफमध्ये भारताने हा पैसा पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता, तसेच मतदानास अनुपस्थित राहिला होता.
Pakistan Support To Terrorism
Pakistan Support To TerrorismSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ला,ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे. त्यातच या दोन्ही देशांनी शस्त्रबंधी करत पेटलेल्या वातावरणाला पूर्णविराम देण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे. यातच अडचणीत सापडलेल्या आणि पाकिस्तानला दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2.3 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. पण आता हा पैसा पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या पुनर्वसनासाठी खर्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जागतिक बँकेनं दणका दिल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज मंजूर केलं होतं. हे कर्ज मंजूर होताच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा पैसा पाकिस्तानातील जनतेच्या विकासासाठी खर्च करण्याऐवजी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं जे दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. भारताच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या जैश ए- मोहम्मदसह इतर दहशतवादी संघटनांना पाकिस्तान मदत करणार असल्याची घोषणा शरीफ यांनी केल्याचं बोललं जात आहे.

भारतानं विरोध करुनही दिलेला पैसा पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी वापरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा असिफ यांनी काही वेळापूर्वीच केलेला पाकिस्ताननं दहशतवाद्यांशी असलेले संबंध तोडल्याचा दावा फोल ठरला आहे.

Pakistan Support To Terrorism
Jayant Patil : राज्यात दोन्ही राष्ट्रवादीत राजकीय सेटलमेंटची चर्चा? जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात मात्र संभ्रमावस्था

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2.3 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या किंमतीची दोन पॅकेज मंजूर केली आहेत. आयएमएफमध्ये भारताने हा पैसा पाकिस्तानला देण्यास विरोध केला होता, तसेच मतदानास अनुपस्थित राहिला होता. पाकिस्तान हा पैसा दहशतवाद्यांवर खर्च करणार असा इशारा भारताने दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे आयएमएफकडून पाकिस्तानला तातडीने 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,500 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

पाकिस्ताननं हा संपूर्ण पैसा भारताविरोधात शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी वापरणार असल्याचं बोललं जात होतं. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेला या पैशांचा वापर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आणि दहशतवादी अड्डे पुन्हा बांधण्यासाठी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Pakistan Support To Terrorism
Tejasvee Ghosalkar : भले भले सोडून गेले... पण राजीनामा देताच समजूत काढण्यासाठी 'मातोश्रीच' बोलावणं; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तसेच पाकिस्तान सरकार हे ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना तब्बल 1 कोटी रुपयांची मदत करणार असल्याचीही संतापजनक माहिती समोर येत आहे. यामुळे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वीच आयएमएफकडून पैसा मिळण्याचे समजताच भारताला डिवचलं होतं.

पंतप्रधान शरीफ यांनी 'पाकिस्तानसाठी आयएमएफने 1 अब्ज डॉलर्सचा हप्ता मंजूर करणे हे भारताच्या दबाव धोरणाचे अपयश असल्याचं म्हटलं होतं. IMF ने पाकिस्तानला प्रस्तावित केलेल्या 1.3 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर मतदान करण्यापासून भारत अलिप्त राहिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com