Chhannulal Mishra  Narendra Modi
Chhannulal Mishra Narendra Modi sarkarnama

Chhannulal Mishra Passes Away : PM मोदींना वाराणसीला आणणारा चेहरा काळाच्या पडद्याआड

Chhannulal Mishra Narendra Modi : पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक प्रकट केला आहे.
Published on

Chhannulal Mishra News : हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडीत छन्नूलाला मिश्र यांचे आज उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये वाराणसीमधून उमेदवार होते. तेव्हा पंडित छन्नूलाल हे मोदींचे प्रस्तावक होते.

पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स अकाऊंटक पोस्ट करत म्हटले आहे की, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या निधनाने खुप दु:ख झाले. त्यांचे जीवन भारतीय कला आणि संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी समर्पित होते.

शास्त्रीय संगीताला लोकांपर्यंत पोहण्याच्यासोबतच भारतीय परंपरेला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचे अमूल्य योगदानआहे. माझे भाग्य आहे की, मला त्यांचे स्नेह आणि प्रेम मिळाले. 2014 मध्ये वाराणसीच्या सीटवर ते माझे प्रस्तावक होते. दुखःच्या या प्रसंगी मी मिश्रा कुटुंबीयांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो, असे देखील पंतप्रधान म्हणाले.

Chhannulal Mishra  Narendra Modi
Nashik BJP Politics: शिक्षण मंत्री दादा भुसेंवर भाजप आमदारांची कुरघोडी; भुसेंनी पोलीस आयुक्तांची भेट घेताच आमदार झाले सक्रीय!

पंडित छन्नूलाल मिश्र यांच्या मुलीने सांगितले की, मागील 17-18 दिवसांपासून त्यांना तब्येतीची कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे चार वाजता निधन झाले. छन्नूलाल मिश्रा यांच्यावर अंतिम संस्कार आज पाच वाजता वाराणसी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा तबला वादक रामकुमार मिश्र आणि तीन मुली आहेत.

Chhannulal Mishra  Narendra Modi
Nashik Kumbhmela : आयुक्तांच्या इशाऱ्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले; कुंभमेळ्याचं काम नीटच करावं लागणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com