Parliament Monsoon Session 2026: पावसाळी अधिवेशनापूर्वी खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाचे नवे आदेश

Monsoon Session 2026 Parliament Security Guidelines:20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाने खासदारांना स्मार्ट वॉच, स्मार्ट ग्लास, पेन कॅमेरे व रेकॉर्डिंग उपकरणांच्या वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
Monsoon Session 2026 Parliament Security Guidelines
Monsoon Session 2026 Parliament Security GuidelinesSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (20 जुलै) सुरू होत आहे. अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने सर्व खासदारांसाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. संसद परिसरात स्मार्ट घड्याळे, स्मार्ट चष्मे, पेन कॅमेरे आणि रेकॉर्डिंग करू शकणाऱ्या इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापराबाबत कडक सूचना दिल्या आहेत.

संसद परिसरात अशा उपकरणांचा वापर संसदेची सुरक्षा, सदस्यांची गोपनीयता किंवा संसदीय विशेषाधिकार धोक्यात येतील अशा पद्धतीने करू नये. आधुनिक उपकरणांमुळे फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग सहज शक्य होत असल्याने संवेदनशील माहिती अनवधानाने किंवा जाणूनबुजून बाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे संसदेच्या प्रशासनाकडून खासदारांना कळविण्यात आले आहे.

डिसेंबर 2025 मध्येही देण्यात आला होता सल्ला

लोकसभा सचिवालयाने यापूर्वी डिसेंबर 2025 मध्येही अशाच प्रकारचे मार्गदर्शक निर्देश जारी केले होते. संसद परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सदस्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी अशा उपकरणांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. पूर्वी अनधिकृत रेकॉर्डिंगच्या घटनांमुळे काही खासदारांवर कारवाई आणि निलंबनाची वेळ आल्याची उदाहरणेही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे निर्देश पुन्हा जारी करण्यात आले आहेत.

Monsoon Session 2026 Parliament Security Guidelines
Headmaster Promotion: शेकडो मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा : हायकोर्टाने सोडवला तब्बल 28 वर्षांपासूनच प्रलंबित प्रश्न

आधुनिक उपकरणांमुळे सुरक्षेची चिंता

बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात सचिवालयाने नमूद केले आहे की, स्मार्ट वॉच, स्मार्ट ग्लास, पेन कॅमेरे आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता सहज उपलब्ध आहेत. ऑनलाइन माध्यमातून ही उपकरणे काही मिनिटांत मागवता येतात. मात्र त्यामधील रेकॉर्डिंग, छायाचित्रण आणि व्हिडिओ तयार करण्याच्या सुविधांमुळे संसद परिसरातील संवेदनशील माहितीची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उपकरणांचा वापर अत्यंत जबाबदारीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Monsoon Session 2026 Parliament Security Guidelines
Ashok Chavan : नांदेड जिल्हा बँकेत अशोक चव्हाण यांचा 'सबका साथ'फॉर्म्युला! सर्व संचालक बिनविरोध?

19 बैठका; अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 19 बैठका होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि मंजुरीचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरीकडे, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. अधिवेशनाचा अंतिम कार्यक्रम आणि कामकाजाचे नियोजन बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत निश्चित केले जाणार आहे.

या अधिवेशनात 130वे घटनादुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) संदर्भातील प्रस्ताव, तसेच 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com