Sangamner Municipal Council : तुझे देख लूंगा..., नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच धमकी!

Crime : संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangamner Municipal Council Protest
Sangamner Municipal Council Protestsarkarnama

Nagar : 'तुझे देख लूंगा, दुकान फिरसे यही लगाऊंगा', असा थेट दमच संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अतिक्रमण करणाऱ्याने धमकावले. अतिक्रमणधारकाने धमकी देताना हातातील कागदांचा गठ्ठा मुख्याधिकाऱ्यांवर भिरकावला. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.संगमनेर शहरातील लखमीपुरा मशिदीच्या विश्वस्त मंडळाने अतिक्रमण करुन त्यावर थाटलेली दुकाने नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकानी काढली.

Sangamner Municipal Council Protest
Assembly Winter Session : भुजबळ, वडेट्टीवार, जरांगेंनी महाराष्ट्र एकसंध ठेवावा; आमदार लांडगेंची कळकळीची विनंती

नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करुन लखमीपुरा पंच ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मुस्ताक बेग व इतर भोगवटादारांनी ही जागा परस्पर शेख रफिक इजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी याला भाड्याने दिली. सुन्नी याने या जागेत `इंडिया पाटा` नावाने दुकान थाटले. फैज रहमतुल्ला व इतरांनी ही अतिक्रमणे काढावीत, असे निवेदन दिले. याची दखल घेत नगरपरिषदेने चार महिन्यांपासून लखमीपुरा पंच ट्रस्ट व संबंधित भोगवटादार रफिक सुन्नी यांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. मात्र अतिक्रमणधारकाने त्याकडे दुर्लक्ष केले.

नगरपरिषदेच्या पथकाने प्रत्यक्ष जात कारवाई सुरू होणार असल्याने सांगितल्यावर शेख रफिक इजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी याने अतिक्रमण काढून घेण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिली. त्यामुळे पथक माघारी फिरले.मात्,र प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी अतिक्रमण काढण्याऐवजी त्याने सदरील जागेला कंपाऊंड केले. तिथे धार्मिक झेंडा फडकावला. मात्र मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे, अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते व सहायक नगररचनाकार शुभम देसले यांनी अतिक्रमणधारकाला त्या जागेतील सामान काढून घेण्यासाठी आवश्यक वेळ दिला. तरी देखील प्रतिसाद न मिळाल्याने नगरपरिषदेच्या जेसीबीने अतिक्रमणावर कारवाई केली.

Sangamner Municipal Council Protest
Winter Session 2023 : सभागृहाची इच्छा असेल तर बीड जाळपोळप्रकरणी दोन दिवसांत एसआयटी; फडणवीसांची घोषणा

यावर रफिक शेख आक्रमक झाला आणि हातातील कागदांचा गठ्ठा मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दिशेने भिरकावली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला. हा प्रकार सुरु असतानाच सारिक शेख उर्फ सऱ्या याने नगरपरिषदेच्या जेसीबी चालकासह अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देण्यास सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी रफिक एजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी आणि सारीक एजाज शेख उर्फ सऱ्या या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकावर धावून जाणारे संगमनेर शहरात मुक्तपणे फिरत असल्याने विविध संघटनांकडून आणि नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दोषींवर त्वरित कारवाई करावी अन्यथा नागपालिकेचे सर्व कर्मचारी कार्यालयीन कामकाज बंद ठेऊन आंदोलनाचा इशारा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Sangamner Municipal Council Protest
Lok Sabha Election : गडकरी, फडणवीस अन् 'आरएसएस'च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेस लोकसभेचा शंखनाद करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com