Parliament Session Live : ओम बिर्ला संतापले; राहुल गांधींचा माईक बंद केल्याच्या मुद्द्यावरून खडसावले

Lok Sabha Session 2024 Om Birla Rahul Gandhi : मागील आठवड्यात लोकसभेत राहुल गांधी बोलत असताना माईक बंद होता. त्यावरून विरोधकांनी अध्यक्षांवर माईक बंद केल्याचा आरोप केला होता.
Rahul Gandhi, Om Birla
Rahul Gandhi, Om BirlaSarkarnama

New Delhi : संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाला सोमवारपासून सुरूवात झाली. लोकसभेमध्ये विरोधकांनी पुन्हा एकदा नीटवर चर्चेसाठी आग्रह धरला. पण त्याचवेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माईकचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना चांगलेच खडसावले.

ओम बिर्ला लोकसभेत संतापलेले दिसले. मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक बंद केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अनेक खासदारांनी मीडियाशी बोलताना तसेच सोशल मीडियातही हा मुद्दा मांडला. त्यावरून बिर्ला यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली.

Rahul Gandhi, Om Birla
New Criminal Laws : नवीन फौजदारी कायदे लागू; काँग्रेसला झाली 146 खासदारांच्या निलंबनाची आठवण

अध्यक्ष बिर्ला म्हणाले, अनेक सदस्यांनी सभागृहाबाहेर माईक बंद केल्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या आसनावर बसलेली व्यक्ती माईक बंद करत नाही. ज्यांचा नाव घेतले जाते त्यांचा माईक सुरू होतो, ही अनेक वर्षांपासूनची व्यवस्था आहे. माईकचा कंट्रोल आसनावर बसलेल्या व्यक्तीकडे नसतो.

के. सुरेश यांच्याकडे हात दाखवत बिर्ला यांनी त्यांनाही सवाल केला. सुरेश यांना विचारा, तेही इथे बसले होते. त्यांच्या हातात कंट्रोल असतो का? असे म्हणताना बिर्ला चांगलेच संतापलेले दिसले. त्यानंतर बिर्ला यांनी सभागृहाची पुढील कारवाई सुरू केली.

Rahul Gandhi, Om Birla
Rahul Dravid Vs Rahul Gandhi : आयुष्यात अडचणी आल्यास राहुल द्रविडसारखे बना, राहुल गांधी नाही!

दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत नीटच्या मुद्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्याची मागणी लावून धरली. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी नीटवर एक दिवस चर्चा करावी, असे ते म्हणाले. त्यावर अध्यक्षांनीही नोटीस देण्यास सांगत त्यावर सकारात्मकता दर्शवली. त्यानंतर सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला सुरूवात झाली. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी चर्चेला सुरूवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com