Lok Sabha Speaker : ना तेलगू देसम, ना जेडीयू; कोण होऊ शकते लोकसभेचा अध्यक्ष? वाचा...

Parliament Session 2024 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभा अध्यक्षांची निवड होऊ शकते.
narendra modi chandrababu naidu nitish kumar
narendra modi chandrababu naidu nitish kumarsarkarnama

Lok Sabha Session 2024 : भाजपच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा 'एनडीए' सरकार स्थापन झालं आहे. सोमवारपासून ( 24 जून ) 'मोदी 3.0' सरकारचं पहिलं अधिवेशन सुरू झालं. हे अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

पण, निवडणुकीपूर्वी 'एनडीए'च्या मित्रपक्षांकडे लोकसभा अध्यक्षपद असावे, असा आग्रह करण्यात येत आहे. 'एनडीए'तील घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांच्या 'जेडीयू' आणि चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांच्या 'टीडीपी'नं लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. पण, भाजपकडून पुन्हा ओम बिर्ला यांच्यावरच विश्वास दाखवण्यात येत आहे.

ओम बिर्ला ( Om Birla ) हे 18 व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) ओम बिर्ला यांच्या मागील कार्याकाळावर आणि कामावर खूश आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ओम बिर्ला यांना पंतप्रधानांचा संदेश पोहोचविल्याची माहिती मिळत आहे.

narendra modi chandrababu naidu nitish kumar
Prashant Kishor : नितीश कुमारांनी 'मोदी 3.0' मध्ये मोठं मंत्रालय का मागितलं नाही? प्रशांत किशोरांनी सांगितलं खळबळजनक कारण

त्याच पार्श्वभूमीवर ओम बिर्ला यांना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. जुन्या संसद भवनातील त्यांचा कक्षही ते वापरत आहेत. सर्वात दिर्घकाळ सभागृह चालविण्याचा विक्रम ओम बिर्ला यांच्या नावावर असल्यानं तेही आनंदीत आहेत.

narendra modi chandrababu naidu nitish kumar
Bjp : धक्कादायक, धुळ्यात उमेदवाराच्या विजयासाठी अधिकाऱ्यांवर भाजपने दबाव टाकला?

भाजपकडून (BJP) ओम बिर्ला यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. जनता दल यूनायटेड आणि तेलगू देसम पक्षानं अध्यक्षपदाचा निर्णय पूर्णपणे भाजपवर सोपवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासह भाजपला लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याऐवजी तेलगू देसम पक्षाला द्यायचं आहे. तर, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सर्व पक्षांशी बोलून अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com