Parliament Session Live : राष्ट्रपतींनी विरोधकांचे कान उपटले; अभिभाषणादरम्यान घोषणाबाजी...

President Droupadi Murmu Joint Address in Parliament : नीट तसेच इतर परीक्षांमधील पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. हा मुद्दा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात मांडून विरोधकांना गप्प केले.
President Droupadi Murmu Speech
President Droupadi Murmu SpeechSarkarnama

New Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणामध्ये गुरूवारी विरोधकांचे कान उपटले. राष्ट्रपती युवकांना सक्षम करण्याबाबत बोलत असताना विरोधकांनी नीट...नीट, अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही सेकंदातच राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातूनच विरोधकांना उत्तर दिले.

मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीचा मुद्दा तापला आहे. नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी झाल्याचे सरकारनेही मान्य केले आहे. त्यावरून विरोधकांनी देशभरात रान उठवले होते. सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा केला आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

President Droupadi Murmu Speech
Parliament Session Live : केंद्राच्या बजेटमध्ये काय असणार? राष्ट्रपतींनी दिले मोठे संकेत

नीटप्रमाणे यूजीसी नेट व इतर परीक्षांमध्ये पेपरफुटीचे प्रकार समोर आले असून अनेक जणांना पोलिसांना अटक केली आहे. या अनुषंगाने राष्ट्रपतींनीही विरोधकांच्या जणू मनातलं ओळखून याचा उल्लेख आपल्या अभिभाषणात केला.

देशातील युवकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळायला हवी, असे राष्ट्रपतींनी सांगताच विरोधकांनी नीट, नीट... असे नारे देण्यास सुरूवात केली. त्यानंतर राष्ट्रपती अभिभाषणात म्हणाल्या, परीक्षांमध्ये बाधा येणे योग्य नाही. पारदर्शकता आवश्यक आहे. पेपर लीकच्या घटनांच्या नि:पक्ष तपास आणि दोषींना कडक कारवाई करण्यावर सरकार कटिबध्द आहे.

President Droupadi Murmu Speech
Parliament Session Live : राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणाआधी ‘आप’चा मोठा निर्णय

विरोधकांचे कान उपटताना राष्ट्रपती म्हणाल्या, ‘यापुर्वीही पेपर लीकच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे त्यावर पक्षीय राजकारण न आणता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. परीक्षांशी संबंधित जोडलेल्या संस्था, त्यांचे कामकाज, आणि परीक्षा प्रक्रियांमध्ये बदल करण्याच्या दिशेने काम करत आहे.’ यावेळी राष्ट्रपतींनी परीक्षा राजकारणाचा दोनदा उल्लेख केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com