Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांचे उद्धघाटन होणार आहे. रविवारी वाराणसीत पंतप्रधान मोदी यांचा 'रोड शो' आयोजित करण्यात आला होता. हा रोड शो सुरु असतानाच एक रुग्णवाहिका आली, यावेळी पंतप्रधान मोदींनी आपला ताफा थांबवत या रुग्णवाहिकेला रस्ता दिला.
पंतप्रधान मोदींनी याआधीही रोड शो सुरु असताना रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला होता. मागील वर्षी अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदी रोड शो करत होते, त्यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला आपला ताफा थांबवत मार्ग मोकळा करुन दिला होता. आता रविवारी ते वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळीही त्यांचा रोड शो सुरु असताना रुग्णवाहिका आली. यावेळी त्यांनी आपला ताफा काही वेळ थांबवत रुग्णवाहिकेला रस्ता दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सोमवारी काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत. याबरोबरच भारत संकल्प यात्रेवर आधारित प्रदर्शनाला देखील ते भेट देत विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात वाराणसी आणि पूर्वांचलमधील तब्बल 19 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी हे नमो घाटावरुन काशी तमिळ संगमच्या 02 कन्याकुमारी ते वाराणसी या नवीन ट्रेनचे देखील उद्घाटन करणार आहेत. सध्या वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. या दौऱ्यात ते तब्बल 19 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन करणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे वाराणसीकरांचे लक्ष लागले आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.