Parliament Winter Session : तृणमूल काँग्रेसला झटका; डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई

Derek O'Brien : डेरेक ओब्रायन यांनी सुरक्षेच्या त्रुटीवरून राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी केली.
MP Derek O'Brien
MP Derek O'BrienSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Security Breach : तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यामुळे आता हिवाळी अधिवशेनाच्या उर्वरित कामकाजामध्ये खासदार ओब्रायन यांना सहभागी होता येणार नाही.

बुधवारी नवीन संसद भवनामध्ये (Parliament House) दोन तरुणांनी घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात हिवाळी अधिवेशनाचे (Winter Session) कामकाज सुरू झाले. दरम्यान राज्यसभेचे (Rajya Sabha) सदस्य असलेले तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी बुधवारी झालेल्या घुसखोरीच्या प्रकरणात झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी बुधवारच्या घटनेवरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

MP Derek O'Brien
Lok Sabha Security Breach : लोकसभेत घुसखोरीचा असा झाला प्लॅन! दीड वर्षांपूर्वी सहा जण भेटले अन्...

सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे कारण देत राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खासदार ओब्रायन यांना सभागृहच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. ओब्रायन हे सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत होते. सभापतींची अपमान करत होते. त्यांची सभागृहातील ही भूमिका योग्य नव्हती, त्यामुळे त्यांना सभागृहातून बाहेर जाण्याचे धनकड यांनी सुचित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिवेशन संपेपर्यंत निलंबन

खासदार ओब्रायन यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई बाबत स्पष्टीकरण देताना सभापती धनकड म्हणाले की, खासदार डेरेक ओब्रायन हे मोठ-मोठ्याने घोषणाबाजी करत होते. त्यांनी बुधवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ केवळ घोषणाबाजीच केली नाही. तर दालनात उतरून सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासह धनकड यांनी सभागृहात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांनाही सुचना दिली होती. मात्र, कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

MP Derek O'Brien
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची बाजू असीम सरोदे कोर्टात मांडणार

ओब्रायन यांनी वेलमध्ये उतरून कामकाजात अडथळा आणला त्यामुळे खासदार ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर ही कारवाई हिवाळी अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत म्हणजे 22 डिसेंबर पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान या गदारोळानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित कऱण्यात आले होते.

MP Derek O'Brien
Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोरीप्रकरणी लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई; आठ कर्मचारी निलंबित

संसदेत झाली होती घुसखोरी

बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच दोन घुसखोरांनी लोकसभेच्या सभागृहात घुसखोरी केली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून त्यांनी सभागृहात उड्या मारल्या होत्या. त्यातील एकाने सदस्यांच्या आसनांवर उड्या मारत स्मोक कँडल उडवले. त्यामुळे सभागृहात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सभागृहातील सदस्या्ंनी त्या घुसखोरांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या स्वाधीन केले. मात्र सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीमुळे चा प्रकार घडला होता. त्यावरून आज राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला.

(Edited By - Rajanand More)

MP Derek O'Brien
Lok Sabha Security Breach: धमकी खरी ठरवल्यानंतर पन्नूने जाहीर केली संसदेतील घुसखोरांसाठी 10 लाखांची मदत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com