देशात सर्वांत स्वस्त अन् महाग पेट्रोल कुठं मिळतं? जाणून घ्या...

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशात इंधन दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. देशातील सर्वांत स्वस्त पेट्रोल दीव दमणमध्ये तर महाग राजस्थानमधील गंगाननगमध्ये आहे.

देशात सर्वांत महाग पेट्रोल राजस्थानमधील गंगानगरमध्ये आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 115.14 तर डिझेलचा दर प्रतिलिटर 105.64 रुपये आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दीव दमण पेट्रोल सर्वांत स्वस्त आहे. तेथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 98.26 रुपये आहे. देशातील राज्यांच्या राजधान्यांपैकी केवळ डेहराडून, चंडीगड, गुवाहाटी आणि रांची या चार ठिकाणी पेट्रोलचा दर शंभरच्या आत आहे.

देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 103.24 रुपये तर मुंबईत 109 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 91.77 रुपये आणि मुंबईत 99.55 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत.

Petrol and Diesel prices
सात जणांच जाणं मोदींच्या मनाला चटका लावून गेलं; पाच लाखांची नुकसान भरपाई जाहीर

देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर पोचली आहे.

Petrol and Diesel prices
नवाब मलिकांनी मध्यरात्री टाकलेल्या ट्विटबॉम्बने एनसीबीसह भाजप अडचणीत

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) आणण्याच्या प्रस्तावावर जीएसटी परिषदेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. लखनौ येथे नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु यावर निर्णय झालेला नव्हता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल व डिझेलवर जीएसटी लागू केल्यास देशभर फक्त 28 टक्के कर लागू होईल. म्हणजेच केंद्र सरकार आणि विविध राज्यांमध्ये असलेले सर्वप्रकारचे कर रद्द होऊन केवळ जीएसटी असेल. असे झाल्यास इंधनाचे दर 30 ते 40 टक्कयांनी खाली येऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com