

India political news : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. काही तासांत पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार, याचे उत्तर मिळले. मतमोजणीसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असताना देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे.
मतदानानंतर विविध एनज्सीचे एक्झिट पोल समोर आले. त्यामध्ये केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफची सत्ता येणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. मागील दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या एलडीएफला सत्ता गमवावी लागू शकते. असे झाल्यास देशात अनेक वर्षांनंतर डाव्या पक्षांची एकाही राज्यात सत्ता नसेल.
एकीकडे डाव्या पक्षांबाबत या चर्चांना उधाण आलेले असतानाच मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी सोशल मीडियातून आपल्या पदाचा उल्लेख काढून टाकला आहे. त्यांच्या या कृतीमुळे आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. निवडणुकीच्या निकालाला अद्याप काही काही बाकी आहे. मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार. त्याआधीच विजयन यांनी हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी मुख्यमंत्री हा उल्लेख हटवत त्याजागी ‘पॉलिट ब्यूरो मेंबर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)’असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या या पावलामध्ये कोणती राजकीय रणनीती तर नाही ना, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. हा राज्यातील जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी सूचक संदेशही असू शकतो, असेही मानले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता निकालानंतरच याबाबतचा खुलासा होऊ शकतो. केरळमध्ये विजयन हे २०१६ पासून मुख्यमंत्री आहेत. सलग तिसरा विजय मिळवून ते मुख्यमंत्रिपदावर पुन्हा विराजमान होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एलडीएफीची सत्ता आल्यास अन्य चेहऱ्याला संधी मिळणार का, अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.