Assembly Elections Result : देशाचं लक्ष लागलेल्या ‘या’ हायहोल्टेज लढतींनी वाढविली धडधड; भाजप, काँग्रेस, तृणमूलला धक्का बसणार?

BJP vs Congress election, TMC election result : एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालची सत्ता भाजप काबीज करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर तमिळनाडूत डीएमके आणि केरळात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे.
Assembly election results.
Assembly election results.Sarkarnama
Published on
Updated on

India election results live : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. कोणत्या राज्यात कुणाची सत्ता येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण त्यातही या पाच राज्यांतील काही हायहोल्टेज लढतींकडेही देशाचं लक्ष लागले आहे. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमधील या लढतींचा निकाल राजकीय चित्र बदलू शकतात.

पश्चिम बंगाल

देशातील सर्वात हायप्रोफाईल लढत म्हणून भवानीपूर मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जात आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूध्द भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी असा सामना आहे. अधिकारी यांनी मागील निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात ममतादीदींचा पराभव केला होता. ममतांनी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत विजय मिळविला होता.

नंदीग्राममध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असून सुवेंदू अधिकारी या मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसचे पवित्र कार रिंगणात आहेत. ते अधिकारी यांचे विश्वास सहकारी होते. तृणमूल त्यांनाच मैदानात उतरवत अधिकारी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. अधिकारी हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानला जात आहेत. बंगालमधील खरगपूर, आसनसोल दक्षिण, मुर्शिदाबाद, नौडा आदी मतदारसंघही हायहोल्टेज आहेत.

Assembly election results.
Assembly Election Result : टपाली मतांची तीन वर्षांनंतर पुन्हा मोजणी; काँग्रेस आमदाराला धक्का, भाजपच्या पराभूत उमेदवाराने मारली बाजी...

आसाम

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे जलुकबारी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने विदिशा निओग यांना तिकीट दिली आहे. सरमा २००१ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे यावेळी पुन्हा ते बाजी मारणार का, याकडे लक्ष लागले आहे. आसाममधील दुसरा मतदारसंघ म्हणजे जोरहाट. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई विरूध्द भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांचा या मतदारसंघात सामना आहे. गोगोई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तमिळनाडू

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या कोलाथूर आणि त्यांचे पुत्र व उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या चेपॉक थिरूवल्लीकेनी मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष असेल. हे दोन्ही मतदारसंघ डीएमकेचा बालेकिल्ला असले तरी यावेळी सुपरस्टार विजय यांच्यामुळे निवडणूक अटीतटीची बनली आहे. स्वत: विजय हे पेराम्बूर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यांची पहिली निवडणूक असल्याने निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Assembly election results.
West Bengal exit poll : पश्चिम बंगालमधील ‘एक्झिट पोल'चा बांग्लादेशने घेतला धसका; खासदाराने संसदेत भाजपचा उल्लेख करत सरकारला केलं अलर्ट...

केरळ

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचा धर्मादोम हा मतदारसंघ असून यूडीएफचे व्ही. पी. अब्दुल रशीद आणि भाजपचे के. रंजित त्यांच्याविरोधात आहेत. परावूरमध्ये विरोधी पक्षनेते व्ही. डी सतिशन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्याविरोधात सीपीआयचे ईटी तायसन मैदानात आहेत.

पुदुच्चेरी

राज्यातील मतदारसंघांचा आकार आणि मतदारसंख्याही कमी असल्याने बहुतेक मतदारसंघात काँटे की टक्कर असते. त्यातही मुख्यमंत्री एन. रंगास्वामी आणि काँग्रेस नेते व्ही. वैथिलिंगम यांच्यातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. हा रंगास्वामी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com