PM Kisan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! 6 हजारांऐवजी 12 हजार येणार का? अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

PM Kisan scheme latest news 2026 : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६ हजारांऐवजी १२ हजार मिळणार का? अर्थमंत्र्यांनी यावर स्पष्ट माहिती दिली आहे.
PM-KISAN Nidhi
PM-KISAN NidhiSarkarnama
Published on
Updated on

PM Kisan योजनेबाबात सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता शेतकरी 22 व्या हप्त्याची वाट बघत आहेत. या योजनेच्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी 6 हजार रुपयांऐवजी ही रक्कम 12 हजार होणार का?, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून आणि अर्थमंत्र्‍यांकडून याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली असून सध्या तरी पीएम किसान योजनेतील रक्कम वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

कृषी कल्याण मंत्रालयाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी आपली प्राधान्ये आणि उद्दिष्टे जाहीर केली आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेसाठी यंदाही 63,500 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निधी मागील वर्षाइतकाच आहे. त्यामुळे बजेटमध्ये कोणतीही वाढ न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

PM-KISAN Nidhi
DSP Kalpana Verma : लेडी DSP चा 'हनीट्रॅप' गेम; डायमंड रिंग, लक्झरी कारसह व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा, पोलीस दलात खळबळ

यामुळे 6,000 रुपयांची मदत 12,000 रुपये होणार का, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सरकारने योजनेत कोणताही बदल न करता तीच रक्कम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

या योजनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक लाभ मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर आर्थिक आधार मिळावा, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या निधीचा मुख्य उद्देश फक्त शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे एवढाच नाही तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या दैनंदिन खर्चातही त्यांना या आर्थिक मदतीचा लाभ मिळतो. यामुळे त्यांना बियाणे, खते किंवा शेतीशी निगडीत सामान विकत घेण्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी या रक्कमेचा उपयोग होतो. त्यामुळे पीएम किसान निधी योजनेता शेतकऱ्यांना आधार मिळतो असे म्हणता येईल.

PM-KISAN Nidhi
UPSC update : IAS, IPS साठी सर्वात कठीण परीक्षा घेणाऱ्या UPSC ची मान खाली; गलथान कारभार चव्हाट्यावर...

दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे 9.5 कोटी पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेता थेट लाभ देण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे.यासाठी मंजूर केलेला संपूर्ण निधी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याला सामोरे जावे लागणार नाहीये .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com