

UPSC notification errors : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या IAS, IPS, IFS या सेवांमध्ये भरती होणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेणारी संस्था. परीक्षांमध्ये किरकोळ चुकाही आयोग खपवून घेत नाही. लेखी परीक्षेसह मुलाखतींमधून योग्य उमेदवारांची निवड करताना अत्यंत कठोर चाळणी लावली जाते. पण याच आयोगाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आयोगाकडून ४ फेब्रुवारीला सिव्हील सर्व्हिस परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) या परीक्षांचे नोटिफिकेशन जारी केले आहे. पण या नोटिफिकेशनमध्येच अनेक चुका असल्याचे समोर आले आहे. त्यावरून आयोगावर चोहोबाजूने टीका होऊ लागली आहे. घटनात्मक संस्था असलेल्या आयोगाकडून कोणतेही नोटिफिकेशन अत्यंत काळजीपूर्वकपणे काढणे अपेक्षित असताना अनेक शब्दांच्या स्पेलिंगमध्ये, टायपिंगमध्ये गंभीर चुका झाल्याने उमेदवारांनाही धक्का बसला आहे.
आयोगाकडून ९३३ जागांसाठी २१ ऑगस्ट रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. हे नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर काही मिनिटांतच उमेदवारांकडूनच आयोगाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवण्यात आले. चुकलेल्या शब्दांची लिस्टच सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. असे जवळपास ४० शब्द असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून राजकारणही तापले आहे.
कोणते आहे हे शब्द?
- Examination ऐवजी Examinaiton (तीनवेळा उल्लेख)
- Candidate ऐवजी Cadidate (तीनवेळा उल्लेख)
- Statutory ऐवजी Statuary
- PRATIBHA Setu ऐवजी PRABITHA Setu
- Kolkata ऐवजी Kolkatta
- Functional ऐवजी Functinal
काँग्रेस नेत्याचा संताप
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारमध्ये देशातील प्रमुख संस्थांची प्रतिष्ठा आणि विश्वासावरील संकट अधिक गडद झाले आहे. लोकसेवा आयोगाने नोटिफिकेशनमध्ये ४० चुका केल्या आहेत. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केवळ पदांची संख्या कमी झाली नाही तर परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वसनीयताही कमी झाली आहे.
नोटिफिकेशनमध्ये एवढ्या चुका असतील तर प्रीलिम्स परीक्षेपासून मुख्य परीक्षेचे आव्हान पार करून मुलाखत आणि नंतर निवडीपर्यंत पोहोचणाऱ्या परीक्षार्थींना किती चुकांचा डोंगर पार करावा लागेल, असा सवाल सुरजेवाला यांनी केला आहे. देशात कॉलेज आणि विद्यापीठांच्या कॅंपसचे आरएसएस आणि भाजपीकरण करून उच्च शिक्षण प्रणालीला बरबाद करण्यासोबतच भाजपने यूपीएससीला उद्धस्त करण्याचे ठरविल्याचे वाटते, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.