DSP Kalpana Verma : लेडी DSP चा 'हनीट्रॅप' गेम; डायमंड रिंग, लक्झरी कारसह व्यावसायिकाला कोट्यवधींचा गंडा, पोलीस दलात खळबळ

DSP Kalpana Verma suspended for honeytrap allegations: लेडी DSP वर हनीट्रॅपद्वारे 2.5 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. या प्रकरणामुळे महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Lady DSP Kalpana Verma accused of extorting 2.5 crores from Raipur businessman
Lady DSP Kalpana Verma accused of extorting 2.5 crores from Raipur businessmanSarkarnama
Published on
Updated on

Lady DSP Honeytrap Scandal: पोलीस दलाला हादरवून टाकणारा एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्हात कार्यरत असलेल्या DSP कल्पना वर्मा यांनी एका नामांकित व्यावसायिकाला कोट्यवधि रुपयाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.

हनीट्रपच्यामाध्यमातून त्या व्यवसायिकाकडून पैसे उकळल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर छत्तीसगड सरकारने कल्पाना वर्मा यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.


सरकारच्या आदेशानुसार, त्यांच्या चौकशीत आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या आहेत. त्यामुळे तपासात नोंदवलेले जबाबाच्या आधारावर या प्रकरणाशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक विरोधाभास दिसून आले आहेत. आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या आर्थिक लाभ मिळवणे तसेच उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता जमा केल्याचाही पुरावे समोर आले आहेत.

निलंबन काळात कल्पना वर्मा (Kalpana Verma) यांचे मुख्यालय नवा रायपूर येथील पोलीस मुख्यालय असणार आहे. नियमांनुसार त्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे. ही कारवाई DSP कल्पना वर्मा आणि रायपूरमधील व्यावसायिक दीपक टंडन यांच्यातील वादाच्या चौकशीनंतर करण्यात आली.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत सुमारे 1475 पानांचा सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

Lady DSP Kalpana Verma accused of extorting 2.5 crores from Raipur businessman
रेपो रेट म्हणजे काय? तो कमी जास्त झाल्याने कर्जदारांना खरंच दिलासा मिळतो? जाणून घ्या

माहितीनुसार, चौकशीत DSP आणि व्यावसायिक यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्या आहेत. या चॅटमध्ये पोलिसांशी संबंधित संवेदनशील व गोपनीय माहिती शेअर केल्याचे आरोप आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून, गुप्त माहिती गळतीसारखा असल्याचे मत तपास यंत्रणेकडून व्यक्त केले जात आहे.

DSP Kalpana Verma Suspension
DSP Kalpana Verma Suspension Sarkarnama

याआधी दीपक टंडन (Deepak Tandon) यांनी 2021 पासून ‘लव ट्रॅप’च्या माध्यमातून आपल्याकडून सुमारे 2.5 कोटी रुपये उकळल्याचा आरोप DSP कल्पना वर्मा यांच्यावर केला होता. या रकमेमध्ये सुमारे 2 कोटी रुपये रोख, एक आलिशान कार, 12 लाख रुपयांची हिऱ्याची अंगठी, 5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या भेटवस्तूंचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रार करूनही कार आणि दागिने परत न मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

Lady DSP Kalpana Verma accused of extorting 2.5 crores from Raipur businessman
UPSC परीक्षेचे फॉर्म सुटले! जनरलपासून SC-ST पर्यंत, कोणाला किती वेळा देता येणार परीक्षा?

इतकेच नव्हे तर DSP च्या भावाच्या नावावर हॉटेल उघडण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम घेतल्याचा आरोपही करण्यात आला असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी झाली आहे. प्राथमिक तपासात गंभीर बाबी उघड झाल्यानंतर राज्य सरकारने आता कल्पना वर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करत शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com