PM Modi Changed DP: PM मोदींनी बदलला DP ; पोस्ट शेअर करीत सांगितलं कारण

PM Modi Changes DP on Operation Sindoor Anniversary: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील DP बदलून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला आणि दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Operation Sindoor Anniversary News: ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील DP बदलून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला असून दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट केली.

नरेंद्र मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत दहशतवादाविरोधातील भारताची कठोर भूमिका पुन्हा स्पष्ट केली. “ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या अचूकता, धैर्य आणि ठाम निर्धाराचे प्रतीक आहे.” असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे.

पीएम मोदींचा संदेश

पंतप्रधान मोदी म्हणाले, “एक वर्षापूर्वी आपल्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान अद्वितीय धैर्य, अचूकता आणि निर्धार दाखवला. पहलगाममध्ये निष्पाप भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संपूर्ण देश त्यांच्या शौर्याला सलाम करतो.”

हे ऑपरेशन भारताच्या दहशतवादाविरोधातील कठोर भूमिकेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi
Maharashtra revised NPS: सरकारी कर्मचाऱ्यांनो, सुधारित पेन्शन योजना नेमकी काय? सोप्या भाषेत समजून घ्या!

“भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम”

ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पीएम मोदींनी भारतीय सशस्त्र दलांच्या धाडसी आणि अचूक कारवाईचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, हे ऑपरेशन भारतीय सैन्याचे व्यावसायिक कौशल्य, तयारी आणि तिन्ही दलांमधील उत्कृष्ट समन्वय दाखवणारे उदाहरण आहे. यासोबतच त्यांनी “मेक इन इंडिया” संरक्षण प्रणालीची ताकद आणि भारताची वाढती संरक्षण आत्मनिर्भरता यांचाही उल्लेख केला.

“ऑपरेशन सिंदूरमधील भारताचा विजय हा आपल्या वीर जवानांच्या शौर्य आणि देशभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या धैर्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.” असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

PM Narendra Modi
Teacher Recruitment News: राज्यात 13 हजार शिक्षकांची भरती; एका अटीमुळे काही उमेदवारांच्या स्वप्नांवर फिरणार पाणी?

डीपी बदलूनही व्यक्त केला सन्मान

ऑपरेशन सिंदूरच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटची प्रोफाइल फोटोही बदलली. त्यात ऑपरेशनशी संबंधित छायाचित्र ठेवण्यात आले. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही प्रोफाइल फोटो बदलून सैन्याचा सन्मान केला.

काय होते ऑपरेशन सिंदूर?

ऑपरेशन सिंदूर ही ६-७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर केलेली अचूक हवाई कारवाई होती.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या झाल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात हे ऑपरेशन करण्यात आले होते. भारताच्या नव्या “तांत्रिक आत्मनिर्भरता” धोरणाचे हे मोठे उदाहरण मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com