Congress Vs Modi: ‘बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, काँग्रेसला किती जागा मिळाल्या?’ PM मोदींचा टोला; काँग्रेसचं जशास तसं प्रत्युत्तर

MLC Election 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकांचा उल्लेख केला. या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्याचे सांगत, काँग्रेसला किती जागा मिळाल्या, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News : महाराष्ट्रासह चार राज्यांतील विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसला किती जागा मिळाल्या, असा सवाल करत मोदी यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसला टोला लगावला. त्यांच्या या पोस्टनंतर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालांवरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय वाद सोशल मीडियावर रंगला आहे.

मोदींचा काँग्रेसला सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकांचा उल्लेख केला. या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्याचे सांगत, काँग्रेसला किती जागा मिळाल्या, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. या पोस्टमधून मोदी यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास काँग्रेसची कामगिरी कशी राहते, यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच मोदींच्या या ट्विटनंतर काँग्रेसनं नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकली आहे. तिथे अभिजीत वंजारींनी बाजी पलटवत भाजपला धक्का दिला.

काँग्रेसचे प्रत्युत्तर

मोदी यांच्या पोस्टनंतर काँग्रेसनेही ‘एक्स’वरून प्रतिक्रिया दिली. आदरणीय नरेंद्र मोदीजी, तुमच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात तुमच्याच पक्षाच्या उमेदवाराला तुमची लाज राखता आली नाही! जनतेने तुम्हाला नाकारलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही ‘४०० पार’चा नारा दिला होता, पण जनतेने तुम्हाला २४० जागांवरच रोखलं. तुमचे मित्रपक्षही आता तुम्हाला जुमानत नाहीत.

पण दुसरीकडे, राहुल गांधींच्या एका आवाहनावर लाखो लोक स्वेच्छेने रस्त्यावर उतरून तुमच्याविरोधात लढायला तयार आहेत. राहुल गांधी विचारत असलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला तुमचा एकही नेता पुढे येत नाही. हीच तुमची खरी हार आहे!

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Nagpur Election Results: ..अखेर भीती खरी ठरली; नागपूर पदवीधर भाजपनं गमावला; काँग्रेसनं खातं उघडलं; वंजारींनी बाजी पलटवली; कोहळेंना पराभवाचा धक्का

आता तुमच्या पराभवावर औपचारिक शिक्कामोर्तब २०२९ पर्यंत होईल, यात शंका नाही. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे धंदे आता बंद करा. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, असा प्रतिटोला काँग्रेसने लगावला.

चार राज्यांतील २८ जागांच्या निवडणुकांचा संदर्भ

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या एकूण २८ जागांसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचा समावेश होता. या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना विविध राज्यांतील पक्षांच्या कामगिरीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
MLC election results : विधानपरिषदेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल; दोन विद्यमान आमदारांना शिक्षक-पदवीधरांनी बसवलं घरी; चौघांनी खेचून आणली पहिल्यांदाच आमदारकी

मोदी यांच्या पोस्टमुळे बॅलेट पेपरवरील मतदान आणि काँग्रेसच्या निवडणूक कामगिरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसनेही प्रत्युत्तर देत वैचारिक मुद्दा पुढे केला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांपलीकडे जाऊन भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com