MLC election results : विधानपरिषदेच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल; दोन विद्यमान आमदारांना शिक्षक-पदवीधरांनी बसवलं घरी; चौघांनी खेचून आणली पहिल्यांदाच आमदारकी

MLC election results News : विधानपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली होती. ही मतमोजणी बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 36 तास सुरु होती. या निवडणुकीत पाचही मतदारसंघात धक्कादायक निकाल पहावयास मिळाले.
satish chavan, jaynat asgaokar
satish chavan, jaynat asgaokar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागेसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल जवळपास 36 तासानंतर लागला आहे. या तीन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीचे निकाल पाहता दोन विद्यमान आमदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फटका या निवडणुकीत त्यांना बसला. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून 3 नवे चेहरे प्रथमच विधिमंडळात जाणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली होती. ही मतमोजणी बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 36 तास सुरु होती. या निवडणुकीत पाचही मतदारसंघात धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. पुणे शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे (Congress) विद्यमान आमदार जयंत आसगावकर, छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म असलेले सतीश चव्हाण हे दोन विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत.

त्यासोबतच यामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने (BJP) कौस्तुभ गावडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघात गावडे यांनी विद्यमान आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापराव पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी या मतदारसंघातून तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांचा दारुण पराभव केला.

satish chavan, jaynat asgaokar
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

नागपूर पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट पाहवयास मिळत असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी 4 हजार 700 मतांचे लीड तोडले आहे. भाजपच्या सुधाकर कोहळेंवरती त्यांनी 2400 मतांची आघाडी घेतली असून अद्याप 10 हजार मतांची मोजणी बाकी असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. याठिकाणचा निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे.

satish chavan, jaynat asgaokar
Nagpur MLC Results : मतमोजणीवेळी मीडिया सेंटरमध्ये मोबाइल, लॅपटॉप बंदी : नागपूर विभागीय आयुक्तांचा फोनही बंद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुणे पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार अरुण लाड निवडणूक रिंगणात उतरले नव्हते. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हर्षदा जाधव-देशमुख यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने त्यांच्या विरोधात स्मिता जाधव यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हर्षदा जाधव-देशमुख विजयी झाल्या आहेत.

satish chavan, jaynat asgaokar
Nagpur MLC Results : मतमोजणीवेळी मीडिया सेंटरमध्ये मोबाइल, लॅपटॉप बंदी : नागपूर विभागीय आयुक्तांचा फोनही बंद; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अमरावती शिक्षक मतदारसंघात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार किरण सरनाईक हे विजयी झाले आहेत. चार विद्यमान आमदार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये केवळ किरण सरनाईक यांना संधी मिळाली आहे. दुसरीकडे चार नवे चेहरे पहिल्यांदाच विधिमंडळात जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com