Vijay wadettiawar : भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा गेली; वडेट्टीवारांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

BJP leaders controversy : काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त केली.
Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule
Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule Sarkarnama
Published on
Updated on

Wadettiwar vs Bawankule News : सत्ता मिळाली की अनेकांच्या डोक्यात हवा जाते. त्यांचा लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेही तसेच झाले आहे. ते दुसऱ्याला कमी लेखत आहेत. मात्र सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आले नाही, असे सांगून काँग्रेसचे नवनियुक्त विधानसभेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी आशा व्यक्त केली.

काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीवर बावनकुळे यांनी काँग्रेसचा एकही बडा नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता, एवढी दुर्दशा काँग्रेसची झाली असल्याची टीका केली. त्यावर वडेट्टीवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. पूर्व आणि पश्चिम विदर्भ काँग्रेसचा गड राहिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला विदर्भातील जनतेने धडा शिकवला होता.

Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे एकापाठोपाठ एक नवे डाव; महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना?

विधानसभेच्या निकालानंतरही पक्ष ताकदीने उभा आहे. विदर्भातील जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी ताकदीने उभी राहील. मला कोणतेही जबाबदारी दिली तरी मी पार पडणार आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी माझे काम जवळून पाहिले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून मला सपकाळ यांच्यासोबत करावे लागले. ती आमची संयुक्त जबाबदारी असेल. उत्तम समन्वय, संवाद ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन नवीन आम्ही नवीन सुरुवात करणार असल्याचे वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी सांगितले.

Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule
Congress News : सपकाळांच्या नावावरून विखे पाटलांचा काँग्रेसच्या दिग्गजांना टोला

हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतील व्यक्तिमत्त्व आहे. ते पूर्णवेळ संघटनेचा कार्यकर्ता म्हणून सेवा भावी विचारांने काम करतात. तुळशीपत्र वाहून पूर्णवेळ काम करणार नेता असल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रमध्ये काम करू आणि काँग्रेस पक्ष मजबूत करू.

Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule
Congress News : काँग्रेसचं महाराष्ट्रात धक्कातंत्र; 'विक पॉइंट' वरच घाव; तळागळातल्या कार्यकर्त्याला थेट प्रदेशाध्यक्षच बनवलं

नाना पटोले यांच्यावर साधला निशाना

ज्या गोष्टी घडून गेल्या, जे महाभारत झाले त्यावर नव्याने बोलायचे नाही. नवीन टिपणी करायण्याचे कारणही नाही. आमच्यात समन्वयाचा अभाव होता, तो मात्र आता पुढच्या काळात दिसणार नाही. पक्षात असो की महाविकास आघाडीचे मित्र पक्षात असो समन्वय राहील असे सांगून वडेट्टीवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाना साधला.

Vijay wadettiwar, chandrashekhar bawnakule
Harshavardhan Sapkal : मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, राहुल गांधींची महाराष्ट्रासाठी खास रणनीती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com