Modi government schemes 2026 : ‘सेवा तीर्थ’हून पंतप्रधानांचा बिग बॉम्ब; लखपतीदीदी, स्टार्टअप इंडिया अन् कृषी साखळीला कोट्यवधींचा 'बूस्टर'

PM Narendra Modi Announces Crores for Lakhpati Didi, Startup India & Agri Value Chain : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सेवा तीर्थ कार्यालयात बैठक घेत लखपतीदीदी, स्टार्टअप इंडिया आणि कृषी साखळी मजबुतीसाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली.
Modi government schemes 2026
Modi government schemes 2026Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi announcement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सेवा तीर्थ' पंतप्रधान कार्यालयात पहिल्याच बैठकीत, योजनांसाठी निधीचा पेटारा खोलला. कृषी पायाभूत सुविधा, लखपती दीदी योजना आणि 'स्टार्टअप इंडिया', या योजनांवर सर्वाधिक लक्ष केलं आहे.

या योजनांमधून देशात रोजगार वाढीवर भर देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. याशिवाय अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कॅशलेस उपचार योजनेलाही केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

कृषी पायाभूत सुविधा निधीची रक्कम दोन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यासह लखपती दीदींचे लक्ष्य सहा कोटींवर नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. तब्बल 10 हजार कोटी रुपयांच्या निधीसह ‘स्टार्टअप इंडिया मोहिमे’च्या ‘फंड-2’ योजनेची सुरवातही सरकारने केली आहे.

देशाची कृषिमूल्य साखळी मजबूत करण्यासाठी सरकारने कृषी पायाभूत निधीची सुरुवात केली होती. या निधीची यापूर्वी असलेली रक्कम एक लाख कोटी रुपयांवरून दोन लाख कोटींवर नेण्यात आली आहे. शेतकऱ्यांबरोबर (Farmer) वेअरहाऊस कंपन्या आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला या निर्णयाचा मोठा लाभ होईल.

Modi government schemes 2026
Bangladeshi birth certificate case : मुंबईत ‘घुसखोर’ कनेक्शनचा स्फोट! दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित, आठ जणांवर फौजदारी; बांगलादेशी-रोहिंग्यांना दाखले दिल्याचा महापौरांचा दावा

लखपती दीदींचे तीन कोटींचे लक्ष्य साध्य झाले आहे. आता वर्ष 2029 पर्यंत लखपती दीदींची संख्या सहा कोटींवर नेण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने सरकारची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Modi government schemes 2026
Pakistan song dance controversy : स्नेहसंमेलनात वादाचा ठेका! ‘पाकिस्तान’ गाण्यावर डान्स; भाजप नगरसेवकाचा संताप, मुख्याध्यापक-शिक्षकांवर गुन्हा दाखल

‘नवकल्पना’ इकोसिस्टिमला बळकटी देण्यासाठी ‘स्टार्टअप इंडिया फंड 2.0’ मोहीम राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डीप टेक, प्राथमिक टप्प्यातील कल्पना, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग आणि ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजी या क्षेत्राला गती देण्याचा निर्धार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com