PM Narendra Modi : शहांच्या बचावासाठी पंतप्रधान मोदी सरसावले; आंबेडकरांवरून सुरू असलेल्या वादात उडी

PM Modi defends Amit Shah : संविधानावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. शहांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. संसदेतही यावरून गदारोळ झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या वादात उडी घेत शहांचा बचाव केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने सातत्याने आंबेडकरांचा अपमान केला. ते लपवण्यासाठी खोटे बोलल्याचा आरोप मोदींनी केला आहे. खोटेपणामुळे काँग्रेसची चुकीचे कामे लपणार नाहीत. अमित शाह यांना काँग्रेसचा पर्दाफाश केल्याचेही मोदींनी म्हटले आहे.

Amit Shah, Narendra Modi
Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

देशातील लोकांनी वारंवार हे पाहिले आहे की, एका कुटुंबाच्या नेतृत्वाखालील पक्षाने कशाप्रकारे आंबेडकरांचा वारसा मिटवण्याचा आणि एससी, एसटी समाजाला अपमानित करण्यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न केले. काँग्रेस आणि त्यांची सडलेली इकोसिस्टिम विचार करत करत असेल की, त्यांच्या खोटेपणामुळे त्यांची वाईट कामे लपू शकतात, तर हे चुकीचे आहे, असा हल्ला मोदींनी चढवला आहे.

काँग्रेसने एकदा नव्हे तर दोनदा आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केल्याचे सांगत मोदींनी म्हटले आहे की, पंडित नेहरूंनी त्यांच्याविरोधात प्रचार केला आणि पराभवाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. आंबेडकरांना भारतरत्न देण्यास नकार दिला. त्यांचे चित्र संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये लावण्यास नकार दिला, अशी टीकाही मोदींनी केली आहे.

Amit Shah, Narendra Modi
Parliament Winter Session : संसदेत घुमला 'जय भीम'चा नारा; भाजपचा काँग्रेसवर प्रहार, गोंधळामुळे कामकाज तहकूब

एससी आणि एसटी समाजाविरोधात सर्वात भयानक नरसंहार त्यांच्याच काळात झाल्याचे काँग्रेस नाकारू शकत नाही. अनेक वर्षे सत्तेत असूनही त्यांनी या समाजाला सशक्त करण्यासाठी काहीच केले नाही, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली आहे. मागील आठवड्यातही मोदींनी लोसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.

काय म्हणाले होते अमित शाह?

संविधानावर बोलत असताना अमित शाह आंबेडकरांविषयी म्हणाले होते की, आजकाल फॅशन झाली आहे, आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर...आंबेडकर. एवढे नाव देवाचे घेतले असते तर सात जन्मापर्यंत स्वर्गात स्थान मिळाले असते. चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे की, आता आंबेडकरांचे नाव घेत आहेत. त्यांचे नाव शंभरवेळा घ्या. पण त्यासोबत त्यांच्याप्रती तुमच्या भावना काय आहेत, हे मी सांगतो.

आंबेडकरांना पहिल्या कॅबिनेटमधून राजीनामा का द्यावा लागला?, असा सवाल करत शहांना यामागची कारणे सांगितले. ज्यांचा विरोध करता, त्यांचा मतांसाठी नाव घेणे किती योग्य आहे, अशी टीकाही शाह यांनी केली होती. शाह यांनी इतरही काही मुद्द्यांवर काँग्रेसवर निशाणा साधला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com