PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींचे देशातील Gen Z साठी आतापर्यंतची मोठी घोषणा 'विकसित भारत' संकल्पांतर्गत...

Narendra Modi Independence Day 2026 announcement : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदी यांनी देशातील Gen Z आणि तरुणांसाठी मोठी घोषणा केली. ‘विकसित भारत’ संकल्पांतर्गत नेमका काय निर्णय झाला? जाणून घ्या.
PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींचे देशातील Gen Z साठी आतापर्यंतची मोठी घोषणा 'विकसित भारत' संकल्पांतर्गत...
Published on
Updated on

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या ‘विकसित भारत’ संकल्पाला वेग देण्यासाठी केंद्र सरकार येत्या 1 वर्षात देशातील 1 कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चे मोफत प्रशिक्षण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेमुळे देशातील Gen Z आणि युवा वर्गाला भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्याचा मोठा मार्ग खुला होणार आहे. AI, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक कौशल्यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधींसाठी तयार करण्यावर सरकारचा भर राहणार आहे.

PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींचे देशातील Gen Z साठी आतापर्यंतची मोठी घोषणा 'विकसित भारत' संकल्पांतर्गत...
PM Modi Bandhej Pagdi: PM मोदींची बंधेज पगडी अन् पांढरा कुर्ता-पायजमा! काय आहे ‘बंधेज’ कला? लाल रंगाचा खास अर्थ

लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या या ऐतिहासिक प्रवासात देशातील युवा वर्ग सर्वात मोठी ताकद आहे.” विकसित भारताच्या प्रवासात तरुणांची भूमिका निर्णायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमांतर्गत 1 कोटी तरुणांना AI आणि नवीन तंत्रज्ञानाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आणि भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करू इच्छिणाऱ्या युवा वर्गाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

याशिवाय केंद्र सरकारकडून तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्पर्धा परीक्षा तसेच नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षणासाठी या सुविधेचा उपयोग तरुणांना करता येणार आहे.

PM Narendra Modi : स्वातंत्र्यदिनी PM नरेंद्र मोदींचे देशातील Gen Z साठी आतापर्यंतची मोठी घोषणा 'विकसित भारत' संकल्पांतर्गत...
Independence Day Live Updates : भाजप अन् संघाची दलित-आदिवासींबद्दल नीच मानसिकता; खासदार बळवंत वानखडे संतापले

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, भारत 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनेल, तेव्हा या परिवर्तनाचा सर्वाधिक फायदा देशातील तरुणांना होईल. AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही घोषणा भारताच्या युवा शक्तीला भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com