
Baramati News : बारामतीत दोघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनेची दखल घेतली असून त्यांनी संबंधितांचा बंदोबस्त करण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही सज्जड दम भरला आहे.
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेल परिसरात ही मारहाणीची घटना घडली आहे. एका तरुणाला दोघांकडून लाथा-बुक्क्या, पट्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर अजित पवारांनी बारामतीतील एका कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाही सल्ला दिला आहे.
कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, मी पोलिसांना सांगितलंय, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता, कुणीही असलं, त्याच्या मुलाने जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करायचा. मी असलं खपवून घेणार नाही. त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील, पुढे असेच करत राहिले तर पुढे मकोका पण लावीन. मेहरबानी करा, कुणी कायदा हातात घेऊ नका. पोलिसांकडे तक्रार करा.
काही काही जण घरची मालमत्ता असल्यासारखं बदडून काढतायेत, ठोकून काढतायेत. हे होता कामा नये. तुमची मुलं, मुली काय करतायेत, कुठे चुका होतायेत का, हे पाहणे पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती पालकांनी पार पाडावी. नातेवाईकांना पार पाडावी, असे आवाहन अजित पवारांनी केले.
मला तिकडं मुंबईत फोन येतात, जाऊद्या दादा पोटात घ्या. आरं पोट फुटायला लागलं अन् काय पोटात घ्या, पोटात घ्या काहीही सांगतात. सांगणाऱ्यालाही लाज, शरम काहीच वाटत नाही. एवढं त्याला बेदम मारले. शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी सोशल मीडियातून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा व्यवस्थेसमोर सगळे समान आहेत. कायद्याचं उल्लंघन कोणीही करू नये, ते कदापी सहन केला जाणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.