

India US strategic partnership : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही महिन्यांपासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनेक मोठमोठे दावे करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला संघर्ष आपल्या मध्यस्थीनंतर थांबल्याचा दावाही त्यांनी अनेकदा केला आहे. आता अमेरिकेकडून पुन्हा एकदा आणखा एक वाद निर्माण करण्यात आला आहे.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनी धक्कादायक दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनी थेट ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार अंतिम होऊ शकलेला नाही, असा दावा लटनिक यांनी केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारताने अमेरिकेचा हा दावा धुडकावून लावला आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात आठवेळा फोनवरून संवाद झाला आहे. या चर्चेत दोन्ही देशांमधील संबंधांवर महत्वाची चर्चा झाली. त्यावरून दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये थेट संवाद असल्याचे सिध्द होते.
अमेरिकेकडून देण्यात आलेली माहिती खरी नाही. दोन्ही देशांमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ पासून व्यापार करारावर गंभीरपणे चर्चा सुरू झाली. अनेकदा कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो होतो. आम्ही अजूनही दोन्ही देशांना फायदा होईल, अशा करारासाठी तयार आहोत, असेही जयस्वाल यांनी सांगितले.
व्यापार करारावर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादामध्ये जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविली नाही तर ५०० टक्के टेरिफ लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. त्यालाही भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारताचे ऊर्जा धोरण कोणत्याही दबावामुळे बदलणार नाही. आम्ही आमच्या १४० कोटी जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी स्वस्त इंधनाचे स्त्रोत शोधत राहू. भारताचे धोरण अत्यंत स्पष्ट आहे. आम्ही जागतिक बाजारातील चढउतार आणि आपल्या गरजेनुसार निर्णय घेतो. कोणत्याही देशाकडून इंधन खरेदी करण्यास भारत स्वतंत्र आहे, असे स्पष्ट करत जयस्वाल यांनी अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.