PM Modi Manipur Visit: पंतप्रधान मोदींचा हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरबाबत 'हा' मोठा निर्णय

Modi Manipur Visit 2025 : मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर, केंद्र सरकारकडून 13 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या मैतेई आणि कुकी गटांमधील हिंसाचारात आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. मैतेई आणि कुकी समुदायातील संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर तेथे जातीय हिंसाचार भडकला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अशातच आता सुमारे अडीच वर्षे हिंसाचारात होरपळलेल्या मणिपूरबाबत राजधानी दिल्लीतून मोठी अपडेट समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पहिल्यांदाच मणिपूरचा दौरा करणार आहे. हा मोदींचा दौरा येत्या 13 सप्टेंबरला असणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीसच या राज्यातील राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मणिपूरमधील परिस्थिती अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही. याच मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. कारण सरकारला या राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात अपयश आल्यामुळेच इथे पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचं बोललं जात आहे.

Narendra Modi
Prakash Ambedkar News: फडणवीस सरकारच्या 'जीआर'नंतर आंबेडकरांचा नवा बॉम्ब; म्हणाले, 'जरांगेंसह मराठा समाजाची मोठी फसवणूक...'

पंतप्रधान मोदींच्या मणिपूर (Manipur) दौऱ्यापूर्वी शांततेच्या मार्गावर एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर सरकार आणि कुकी-झो गटांसोबत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे 3 मे 2023 रोजी सुरू झालेल्या जातीय संघर्षाचा अंत मिटण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
GST Reform: सरकारचा मोठा गेम! एका गोष्टीवर भरमसाठ वाढवला कर; खाण्यापिण्यासह प्रत्येक गोष्ट होणार महाग

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कुकी-झो गटांनी नवीन करारात मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्यास, राष्ट्रीय महामार्ग-२ (एनएच-२) मुक्त हालचालींसाठी खुला करण्यास आणि दहशतवादी छावण्या स्थलांतरित करण्यास सहमती दर्शविली आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मोठे पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.याचदरम्यान, मोठी सकारात्मक घटना घडली आहे. 2023 मध्ये जातीय हिंसाचार उफाळल्यानंतर हा मोदींचा पहिलाच मणिपूर राज्य दौरा असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग-२ पुन्हा सुरू करण्याबाबत टाकलेलं पाऊल हे राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Narendra Modi
Kolhapur Ward News: 'कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच...'; प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या नेत्याचा कॉन्फिडन्स वाढला

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर, केंद्र सरकारकडून 13 फेब्रुवारी 2025 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या मैतेई आणि कुकी गटांमधील हिंसाचारात आतापर्यंत 260 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेघर झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com