Kolhapur Ward News: 'कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच...'; प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या नेत्याचा कॉन्फिडन्स वाढला

Kolhapur Municipal Corporation : आगामी निवडणुकीत कोल्हापूरकर जनतेच्या ठाम समर्थनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडी निश्चितच अधिकाधिक जागा जिंकून महापौरपद मिळवेल, असा आम्हाला विश्वास असेही मोदी म्हणाले आहेत.
kolhapur news  (1).jpg
kolhapur news (1).jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते विरुद्ध महायुतीतील नेते असा सामना रंगला असताना ठाकरेंच्या शिलेदाराकडूनच या रचनेचे स्वागत केले जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांच्याकडूनच या प्रभाग रचनेचं स्वागत करण्यात आले आहे.

कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेने काल जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार 20 प्रभागातून एकूण 81 नगरसेवकांची निवड होणार आहे. या प्रारूप रचनेचा अभ्यास केला असता, महानगरपालिका प्रशासनाने योग्य लोकसंख्येचे संतुलन राखत, एकत्रित भागांचे नियोजन करून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधांचा विचार केला आहे. असे मत सुनील मोदी यांनी व्यक्त केला आहे.

सत्तारूढ महायुतीचे राजकीय डाव उधळून लावत प्रशासनाने कोणताही दबाव न घेता न्याय्य व विवेकपूर्ण प्रारूप प्रभाग रचना केली आहे. या ठोस व पारदर्शक निर्णयासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासक व अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व आभार मानतो.

kolhapur news  (1).jpg
Prakash Ambedkar News: फडणवीस सरकारच्या 'जीआर'नंतर आंबेडकरांचा नवा बॉम्ब; म्हणाले, 'जरांगेंसह मराठा समाजाची मोठी फसवणूक...'

आगामी निवडणुकीत कोल्हापूरकर जनतेच्या ठाम समर्थनावर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडी निश्चितच अधिकाधिक जागा जिंकून महापौरपद मिळवेल, असा आम्हाला विश्वास असेही मोदी म्हणाले आहेत. दरम्यान मोदी यांच्या या प्रतिक्रिया नंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर येत आहेत.

kolhapur news  (1).jpg
Modi Government: केंद्रात मोठा राजकीय भूकंप! मोदींच्या नेतृत्वातील 'एनडीए' आघाडीला धक्का; 'या' बड्या पक्षानं साथ सोडली

एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी या प्रभाग रचनेबाबत विरोधाची भूमिका स्पष्ट केली नसली तरी महायुतीच्या सरकारच्या काळात न्याय कधी मिळतो, अशी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.